Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | clapping-will-maintain-blood-pressure

टाळीयोगाने दूर होऊ शकतो रक्तदाब

दिव्य मराठी टीम | Update - May 19, 2011, 03:19 PM IST

शारीरिक स्वास्थ मिळवण्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळे उपाय करीत असतो.

  • clapping-will-maintain-blood-pressure

    रक्तदाबाची समस्या दिवसेंदिवस गहन होत चाललीये. काही लोक उच्च रक्तादाबाचा सामना करताहेत तर काही कमी रक्तदाबामुळे (लो बीपी) रुग्णालयाच्या पायऱया सातत्याने चढताहेत. संपूर्णपणे फिट असलेली व्यक्ती शोधणे जास्तच अवघड काम बनले आहे. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या व्याधीने ग्रासलेले आहेच.

    शारीरिक स्वास्थ मिळवण्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळे उपाय करीत असतो. या उपायांमध्येच टाळीयोग हा देखील एक सोपा आणि सुरक्षित उपाय म्हणून मानला जाऊ लागला आहे. मानसिक तणाव, गॅस, अपचन, चिडचिडेपणा, एकाग्रतेमधील कमी या व्याधीने त्रस्त असलेल्यांनी आपल्या उजव्या हाताच्या चार बोटांनी डाव्या हातावर जोरात टाळी वाजविली पाहिजे. सकाळी आणि संध्याकाळी कमीत कमी पाच मिनिटांसाठी हा प्रकार केला पाहिजे. नित्यनेमाने हा योग केल्याने तुम्ही या व्याधीपासून हळूहळू मुक्त व्हाल.

    कमी रक्तदाब (लो बीपी) असलेल्यांनी उभे राहून आपले दोन्ही हात समोर करून खालून वरच्या दिशेने टाळी वाजवत न्यावेत. कमी रक्तदाबाचा त्रास दूर करण्यासाठी या पद्धतीचा मोठा उपयोग होतो. टाळीयोगामुळे ह्रदयरोग, कमरेचे आजार बरे होण्यास खूप मदत होते.

    टाळीयोग करताना दोन्ही हाताची दहा-दहा बोटे आणि पंजे एकमेकांवर जोर जोरात मारत एकसारखा आवाज येईल, हे पाहा. सुरवातीला कमीत कमी दोन मिनिटांसाठी टाळीयोग करीत त्याचा अभ्यास करा. हळूहळू त्यामध्ये दहा मिनिटांपर्यंत वाढ करावी.

Trending