आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्राझीलच्या तुरुंगात दोन गटात वाद, बॅरेकला आग लावल्याने 41 जणांचा होरपळून मृत्यू; 16 जणांचे उडवले मुंडके

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साओ पाउलो/रियो डी जेनेरियो - ब्राझीलमधील तुरुंगात सोमवारी दोन गटांमध्ये झालेल्या भांडणात 57 कैद्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 16 कैद्यांचे मुंडके उडवले होते. ब्राझीलमध्ये तुरुंगाची संख्या कमी आहे. तुरुंगात क्षमेतपेक्षा अधिक कैदी असल्यामुळे ही घटना घडल्याचे समजते. 

 

16 जणांचे उडवले मुंडके

सरकारी अधिकाऱ्यांच्या मते, अल्तामीरा शहरातील तुरुंगात सोमवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी 7 वाजता ही घटना घडली. कमांडो क्लास ए च्या टोळीने कमांडो वेरमेल्हो टोळीच्या सेलला आग लावली होती. मृत कैद्यांपैकी 41 जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर 16 जणांचे मुंडके उडवण्यात आले. दरम्यान तुरुंगातील कैद्यांनी दोन सुरक्षारक्षकांना कैदी बनवले होते. पण नंतर त्यांची सुटका करण्यात आली. 

 

 

तुरुंगाचे संचालक जार्बस वास्कोनसेलोस यांनी सांगितले की, ही घटना ठरवून घडवण्यात आली आहे. याबाबत कोणतीही माहिती नव्हती. यामुळे दोन गटातील वादामुळे ही घटना घडल्याचे समजते. एका व्हिडिओत घटनेनंतर कैदी आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. पण वृत्तसंस्थांनी या व्हिडिओची पुष्टी केली नाही. 


मे महिन्यात 55 कैद्यांचा झाला होता मृत्यू 

यावर्षी मे महिन्यात अॅमेझॉनच्या तुरुंगावर झालेल्या हल्ल्यात 55 कैद्यांचा मृत्यू झाला होता. 2017 मध्ये येथे चाललेल्या हिंसक घटनांमध्ये 150 लोकांचा मृत्यू झाला होता. वर्षभरात ब्राझीलमधील विविध तुरुंगात अधिक वाद होत असल्याचे दिसत आहे.
 

बातम्या आणखी आहेत...