आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाघीण टी-२६ ची मुले टी-५७ आणि टी-५८मध्ये झाले भांडण; दोघेही जखमी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सवाई माधोपूर - रणथंबोरमध्ये प्रदेशावरून वाघांतील ‘रण’थांबण्याचे नाव घेत नाही. सोमवारी सकाळी वाघीण टी-२६ ची मुले टी-५७ व टी-५८ यांच्यात रणथंबोरमध्ये यावर्षी दहा महिन्यांत वर्चस्वावरुन ४ वेळा वाघांचा समोरासमोर सामना झाला आहे. या संघर्षात दोन वाघांना जीव गमवावा लागला आहे. तर तीनजण जखमी झाले आहेत. सोमवारी हा संघर्ष सोलेश्वर महादेवाच्या वस्तीजवळ तिराहे भागात झाला. हा भाग झोन क्रमांक ६ मध्ये येतो. परंतु येथे टी-५७ चे राज्य आहे. तर टी-५८ वाघाचे साम्राज्य झोन ७ व ८ मध्ये आहे. परंतु त्याने १२-१३ वर्षे वयाच्या वयस्कर कुंभा टी-३४ चा भाग ओलांडून येत टी-५७ च्या भागात प्रवेश केला. यानंतर दोघांत संघर्ष पेटला. 
 
याबाबत माहिती अशी की, टी-२६ने एकाचवेळी तीन छाव्यांना जन्म दिला होता. त्यांची नावे टी-५६, ५७ व ५८ ठेवण्यात आली. यापैकी टी-५६ मध्य प्रदेशातील दतिया भागात निघून गेला होता. इतर दोन वाघांनी आपआपल्या भागात साम्राज्य स्थापन केले. वनाधिकारी संजीव शर्मा यांनी सांगितले, दोन वाघांचा प्रदेश खूप वेगळा आहे. परंतु एकमेकाच्या हद्दीत शिरल्याने भांडणे होत आहेत. अशा प्रकारच्या घटना रणथंबोरमध्ये नेहमीच्या आहेत. सकाळच्या सत्रात पर्यटकांना वनभ्रमंतीला नेण्यात आले. तेव्हा झोन क्रमांक ६ च्या पटवा विहीरीजवळ भांडताना दिसले. खूप वेळ चाललेल्या झडपेत दोघेही जखमी झाले आणि माघार घेतली. टी-३९ नूर वाघिणीवरून त्यांच्यात भांडणे झाली,असेही सांगण्यात आले. दोन्ही वाघ ९ वर्षांचे आहेत. त्यांच्यातील भांडणे अद्याप संपलेली नाहीत, असे तज्ञांनी सांगितले. मात्र, वन विभागाच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना या वाघांचे अधिपत्यावरून वारंवार लढण्याच्या घटनांमुळे कायम सतर्क रहावे लागत आहे. 

संख्या मोठी, प्रदेश लहान
1700 चौरस किमी क्षेत्रफळ 
62 वाघ व वाघीण आहेत.
80 चौरस किमी एका वाघाचा प्रदेश असतो. या प्रदेशात दोन वाघिणी राहू शकतात. एकुण  वाघांच्या संख्येच्या मानाने हा प्रदेश लहान आहे. संख्या वाढल्याने वाघांत संघर्ष होणे स्वाभाविक आहे. मोठे होताच वाघ प्रदेशाच्या शोधात अन्य वाघांच्या प्रदेशात जातात. गेल्या दहा महिन्यांत ५ वेळा वाघ समोरासमोर आलेले आहेत. 

> ३० जानेवारी २०१९ : वाघ पॅकमॅन व एक अन्य वाघात संघर्ष. पॅकमन मृत्यूमुखी पडला. 
> ३ एप्रिल : झोन चार व पाचच्या सीमेवर टी-१०४ व टी-६४ मध्ये संघर्ष. टी-१०४ जखमी
> २९ सप्टेंबर : भैरूपुरा क्षेत्रात वाघ टी-१०९ व टी-४२ मध्ये युद्ध. टी-१०९ चा मृत्यू. 
> १५ ऑक्टोबर : टी-५७ व टी-५८ मध्ये संघर्ष

बातम्या आणखी आहेत...