आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमळनेर: मुसळी फाटा ते बेटावद अंतर्गत होणाऱ्या रस्त्याचे काम वादाच्या भोव-यात, हायकोर्टात जनहित याचिका दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमळनेर (जळगाव)- काही हितसंबंधीची जमीन अमळनेर-चौबारी पाडसे रस्त्यावर असल्याने हा रस्‍ताच बदलण्‍याचा घाट येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने घातला आहे, असा आरोप भरवस ग्रामस्थांनी केला आहे. राष्‍ट्रीय महामार्ग क्रमांक 06 अमळनेर ते बेटावदचे हायब्रीडकरन व डांबरीकरणाचे काम सुरु झाले आहे. हे काम नियमबाह्य असल्याचे पुरावे सादर करीत भरवस ग्रामस्थांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात याप्रकरणी याचिका दाखल केली आहे


असा आहे घाट -
या रस्त्याचे काम बेकायदेशिररित्या राज्यमार्ग ०६ वरून जिल्हा मार्ग क्रमांक ६५ मार्गावर नेण्याचा प्रताप सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केल्याने त्यांच्याच विरोधात ग्रामस्थांनी दाद मागितली आहे. रा.मा.क्र.०६ मुळे अमळनेर पारोळा धरणगांव तालुक्यातून शिंदखेडा, दोंडाईचा, शहादा, शिरपूर,नंदुरबार शिवाय मध्यप्रदेश व गुजरात जाण्यासाठी गलवाडे झाडी भरवस, एकलहरे, भिलाली, बेटावद पर्यंतचा मार्ग उपयोगाचा पडतो. म्हणून शासनाने अमृतनीटी अंतर्गत हायब्रीडकरन व डांबरीकरण विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

असा केला बदल
मात्र या मार्गावर भरवस गांवापुढे रेल्वे मार्ग असल्याने रेल्वे मार्गाखालून जाताना मोठ्या वाहनांना त्रास होतो. सदर मार्गावर उड्डाणपूल मंजूर करण्याऐवजी राजकीय दबावापोटी रा.मा.क्र.०६ या  मार्गावरील हायीब्रीडीकरण काम गलवाडे,जैतपीर,चौबारी या जिल्हा मार्गावर करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनात आले आहे. यामुळे झाडी, भरवस,  मुडी, बोदर्डे,  शिरसाळे,लोणतांडा, लोण पंचम,लोणसीम, लोण खुर्द, लोण बुद्रुक, एकलहरे, लोण या गांवाच्या अडचणीत वाढ होणार आहे. तसेच भाडेवाढ देखील होणार आहे. म्हणून या पूर्वी अनेकदा ग्रामस्थांनी निवेदन व तक्रारी केल्या होत्या. राजकीय दबावामुळे न्याय मिळत नसल्याचा आरोप करीत संजय पाटील,किशोर पाटील, उदय पाटील, देविदास पाटील, ओंकार पाटील, बबन मांगो राठोड, शिवाजी पाटील यांनी अॅड. प्रकाश पाटील यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली. लवकरच गणेशोत्सव संपल्यावर ग्रामस्थ उपोषणाला देखील बसणार आहेत.


रस्ता बदल करता येतो का
राज्य मार्ग हा बदलताच येत नसल्याची माहिती एका अभियंत्याने खाजगीत दिली. त्यापेक्षा अडथळा ठरणाऱ्या बोगाद्यावरच जर उड्डाणपुल केला असता तर फायदेशीर झाले असते. मग आधी सर्व्हे करतांना हि बाब नजरेस आली नाही का? हा प्रश्न निर्माण होऊन त्यामुळे या रस्त्याच्या कामात गोंधळ वाढला आहे.

 

त्या कामाचे डीपीआर जळगाव विभागाकडून झाले आहे. त्यामुळे कोणी केले कसे केले हे मला माहिती नाही.
– पी. व्ही. मोराणकर, विभागीय कार्यकारी अभियंता अमळनेर
 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...