आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Class 10 Student Reveals How She Is Being Sexually Abused By Brother, Uncle In Exam Answer Sheets

दहावीच्या मुलीने उत्तर पत्रिकेत मांडली आपबिती; काका, भाऊ रोज पकडतात, मग करतात असे काही...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरूग्राम - हरियाणातील हायटेक सिटी गुरुग्राममध्ये नात्याला काळीमा लावणारी घटना घडली आहे. येथे दहावीत शिकणाऱ्या एका मुलीने सहामाही परीक्षा दिली. तिची उत्तरपत्रिका वाचून शिक्षिकेच्या डोळ्यात पाणी आले. तिने आपल्या उत्तर पत्रिकेत परीक्षेतील प्रश्नांवर नव्हे, तर आपल्या घरातच होणाऱ्या अत्याचाराची आपबिती मांडली. शिक्षिकेने उत्तरपत्रिका वेळीच प्रिन्सिपलला दाखवली. शालेय प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर तिच्या सख्ख्या काका आणि भावाला अटक करण्यात आली आहे. 


हात धरायचे, करत होते असे काही...

> पीडितेने आपल्या उत्तरपत्रिकेत लिहिलेल्या आपबितीप्रमाणे, तिचा सख्खा काका आणि त्याचा मुलगा दोघांनी मिळून तिचे जगणे कठिण केले होते. तिचा काका शेजारच्या घरात राहत होता. तर चुलत भाऊ अभ्यास करण्याच्या बहाण्याने तिच्याच घरात राहायचा. सुरुवातीला चुलत भावाने तिच्यावर वाइट नजर टाकली. येता-जाता तो तिला अश्लील स्पर्श करत होता. आपली तक्रार करत नसल्याचे पाहता त्याची हिंमत दिवसेंदिवस वाढत गेली. यानंतर त्याने घरात कुणी नसताना थेट पकडण्यास सुरुवात केली. अतिशय अश्लील वर्तन करून तो तिची छेड काढायचा. काही दिवसांनी ही गोष्ट शेजारीच राहणाऱ्या तिच्या काकाला कळाली. आपल्या मुलाला धमकावणे सोडून त्याने उलट पुतणीवर अत्याचार सुरू केला. घरात एकटी असताना दोघे तिच्यावर अत्याचार करायचे. 
> आपल्यासोबत इतके घाणेरडे कृत्य होत असल्याचे आई-वडिलांना कसे सांगणार या गोंधळात तिने कुणाला काहीच सांगितले नाही. याच दरम्यान सहामाही परीक्षा डोक्यावर आली होती. 1 ऑक्टोबरला तिचा पेपर होता. उत्तरपत्रिकेत काय लिहावे तिला काहीच सूचत नव्हते. यानंतर तिने आपली संपूर्ण आपबिती लिहिण्यास सुरुवात केली. त्या मुलीने 1 ऑक्टोबर रोजी परीक्षा दिली. पेपर तपासत असताना नुकतेच शिक्षिकेने ते वाचले. अत्याचाराची मांडणी करणारा प्रत्येक शब्द अंगावर काटा आणणारा होता.

 

पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
पोलिसांनी या प्रकरणात पीडित विद्यार्थिनीचा सख्खा काका आणि सख्खा चुलत भाऊ या दोघांना अटक केली. तिचा भाऊ हा अल्पवयीन आहे. त्यामुळे, त्याला फरीदाबाद येथील बाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी दोघांच्या विरोधात बाल लैंगिक शोषण विरोधी कायदा पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...