Home | National | Delhi | class 7 student commits suicide in delhi

दिल्लीत 7 वीत शिकणाऱ्या मुलीने घेतला गळफास, आईने सांगितले मुलीसोबत झाले होते हे...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 07, 2018, 03:08 AM IST

आपल्या दोन्ही हातावर लिहिली सुसाइड नोट- I LOVE U Mummy, मी जात आहे...

 • class 7 student commits suicide in delhi

  नवी दिल्ली- दिल्लीच्या इंद्रपुरी परिसरातील राहणाऱ्या एका 12 वर्षाच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. घटनेवेळी मुलीची आई घरी नव्हती. मुलीने आपल्या हातावर लिहिले 'आय लव यू मम्मी।' आईचा आरोप आहे की, शाळेत सगळ्यांसमोर शिक्षकाने तिला 'कॅरेक्टरलेस' म्हणाले होते, त्यानंतरपासून ती डिप्रेशनमध्ये होती.

  तीन महिन्यांपासून म्हणत होती, शाळा बदलायची आहे

  मुलगी दिल्लीच्या नारायण विहार शाळेत शिकत होती. तिच्या आईचा आरोप आहे की, शाळेत तिला रोज विना कारण रागवायचे त्यामुळे तीन महन्यांपासून शाळा बदलायची आहे असे ती म्हणायची. पोलिसांना मुलीकडे सुसाइड नोट मिळाली आहे, त्यात तिने शाळेवर गंभीर आरोप केले आहेत.

  मुलीने हातावर काय लिहीले?

  मुलीने हातावर लिहीले- 'माझा मृत्युची बातमी शाळेत द्या. लॉर्ड कृष्णा, I am coming. मां आई लव यू।' हे लिहून तिने गळफास घेतला. पोलिस या प्ररणाची चौकशी करत आहेत.

Trending