आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंबाजोगाई - बारावीचे पेपर अवघड गेल्याच्या कारणाने बारावीतील विद्यार्थिनीने शहरातील हाउसिंग सोसायटी येथील राहत्या घरी पंख्याला ओढणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना रविवारी साडेअकरा वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
संचिता चंद्रकांत नरारे (१७, रा. ममदापूर पाटोदा) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात शिवाजी अंतराम संगापुडे यांच्या खबरेवरून आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. अधिक माहिती अशी की, संचिता चंद्रकांत नरारे व तिची आई आणि बहीण हाउसिंग सोसायटीमध्ये किरायाने राहत होते. मृत संचिता नरारे हिचे बारावीचे सर्व पेपर अवघड गेल्याने ती दुःखी होती. रविवारी सकाळी तिची आई व बहीण बाहेर गेले असता संचिताने बेडरूममधील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आई व बहीण घरी आल्यानंतर त्यांच्या लक्षात आली. या घटनेचा अधिक तपास पोलिस हेकॉ. प्रकाश सोळंके करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.