आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पॅरिसमध्ये क्लासिक बाइकचा लिलाव; 48 वर्षे जुनी अगस्ता बाइक 1 कोटी रुपयांपेक्षा जास्तीत विक्रीची अपेक्षा 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस- फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये सुमारे १०० एमव्ही अगस्ता क्लासिक बाइकचा लिलाव होत आहे. याआधी १९७८ च्या एमव्ही अगस्ता ७५० बाइक ८८.५ लाख रुपयांत विकली होती. एमव्ही एमवी (मेकॅनिका व्हर्घेरा) इटलीतील प्रसिद्ध मोटारसायकल ब्रँड आहे. काउंट डोमेनिको अगस्ता नावाच्या व्यक्तीने १९४५ मध्ये कंपनीची स्थापना केली होती. १९७१ मध्ये काउंट यांच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनंतर कंपनीने रेसिंगमध्ये भाग घेणे बंद केले. त्याआधी २७० ग्रांप्री आणि ३८ वर्ल्ड रायडर टायटल आणि ३७ वर्ल्ड कन्स्ट्रक्टर चॅम्पियनशिप जिंकल्या आहेत. भारतात एमव्ही अगस्ताचे ४ मॉडेल उपलब्ध आहेत. 

 

१.७३ कोटी रुपयांत लिलाव झाला होता १९७५ च्या डुकाटीचा 
दोन आठवड्यांपूर्वी लास वेगासमधील लिलावात १९७५ च्या डुकाटी-७५० सुपर स्पोर्टस बाइकचा १.७३ कोटी रुपयांत लिलाव झाला होता. गेल्या वर्षी १९७० ची मंच टीटीएस मॅमट बाइक १.५२ कोटीत विकली. 

 

बातम्या आणखी आहेत...