आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'नवीन प्रयोगांतूनच शास्त्रीय संगीत अधिक समृद्ध होईल' : शास्त्रीय गायक महेश काळे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे : शास्त्रीय संगीत हे केवळ विशिष्ट गटासाठीच असते, हा समज आपल्या अनेक चित्रपटांच्या संगीताला मिळणाऱ्या लोकप्रियतेने मोडून काढला आहे. याचे कारण चित्रपट गीतांमधून वेगळ्या पद्धतीने त्याचे झालेले सादरीकरण. आपल्याला तरुण पिढीत शास्त्रीय संगीत रुजवायचे असेल तर त्यात सातत्याने प्रयोग होत संगीताचे नव्या पद्धतीने सादरीकरण करणे ही आजच्या काळाची आवश्यकता आहे. याच नवनवीन प्रयोगांतून शास्त्रीय संगीत अधिकाधिक समृद्ध होईल, असे मत राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे यांनी व्यक्त केले.

महेश काळे शास्त्रीय संगीत नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्नशील असतात. त्याचाच एक भाग म्हणून 'इनफ्युजन' ही एक नवीन संकल्पना ते श्रोत्यांपुढे आणत आहेत. यानिमित्त गुरुवारी ते बोलत होते. या संकल्पनेचे सादरीकरण सर्व प्रथम एनसीपीए, मुंबई व त्यानंतर गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे येथे १ व २ फेब्रुवारी रोजी होणार आहे. 'इनफ्युजन' कार्यक्रमाचा गाभा हा शास्त्रीय संगीताचाच असणार आहे. यासाठी वाजणारा वाद्यवृंद हा हिंदुस्तानी व पाश्चात्त्य वाद्यांचा असेल. मात्र, असे असले तरी त्यांचा पाया हा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचाच असेले. म्हणजेच नवा साज लेवून आकर्षक पद्धतीने शास्त्रीय संगीत तरुणांना भावेल अशा स्वरूपात ते मी रसिकांसमोर मांडणार आहे, असेही काळे यांनी सांगितले.

हिंदुस्थानी-पाश्चात्त्य वाद्यांसह 'इनफ्युजन'चा प्रयोग

नुकताच 'गेट वे ऑफ इंडिया' येथील प्रयोगाविषयी सांगताना काळे म्हणाले की, मुंबई मधील २६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मी राग 'देस'मधील एक बंदिश, एक अभंग, एक चित्रपट गीत आणि 'वंदे मातरम' हे गीत सादर केले. एकाच रागाची इतकी रूपे रसिकांनाही भावली व नव्या पिढीच्याही समोरही रूपे आली. अशाच पद्धतीने अभिजात शास्त्रीय संगीताचा गाभा कायम ठेवत त्यात तबला, पखवाज, टाळ या पारंपरिक वाद्यांबरोबरच पाश्चात्त्य वाद्यांची 'हार्मनी' मी एकत्र घेऊन येत आहे.
 

बातम्या आणखी आहेत...