• Home
  • Dvm originals
  • cleaning process of water tank and water pipe line at home with hydrogen peroxide and bleaching powder

फक्त 2 गोष्टींनी होते पाण्याची टाकी आणि पाइप लाइनची स्वच्छता, नळांचे प्रेशर सुद्धा वाढेल; प्लम्बरच्या पैशांची होईल बचत

दिव्य मराठी

Apr 09,2019 02:58:00 PM IST


यूटिलिटी डेस्क - घराची पाइपलाइन ब्लॉक होणे नेहमीच अडचण असते. पाण्यात क्षारचे प्रमाण जास्त असल्यास दर महिन्याला ही अडचण येते. पाण्याची प्रेशर सुद्धा कमी होते. यामुले पाईपलाईन स्वच्छ करण्यासाठी प्लम्बरला पाचारण करावे लागतले. प्लम्बरची फी आणि सफाईसाठी वापरण्यात येणाऱ्या प्रोडक्ट्सच्या किमती मिळवून हे काम खर्चिक होते. महिन्यात दोन वेळेस सफाई करण्याऱ्यांसाठी हा खर्च दुप्पट होते. खरं तर या कामाला प्लम्बरची मदत न घेता कमी खर्चात घरबसल्या करू शकतो. यासाठी तुम्हाला 20 ते 40 रूपये किमतीचा हायड्रोजन पॅरॉक्साइड खरेदी करावा लागेल.


याबाबत IIT रूडकी येथून पीएचडी केलेले जीवाजी युनिव्हर्सिटी ग्वाल्हेरचे प्राध्यापक डीडी अग्रवाल यांनी सांगितले की, ब्लिचिंग पावडर आणि हायड्रोजन पॅरॉक्साइडच्या मदतीने टाकीची सफाई सोबत त्यातील जीवाणू देखील संपवता येतात. हायड्रोजन पॅरॉक्साइड हल्क्या निळ्या रंगाचे आणि पाण्यापेक्षा थोडे घट्ट लिक्विड असते.

पाइप लाइन सफाई करण्यासाठी उपयोगी सामान

1. 3 ते 4 बादली पाणी
2. 50 ग्रॅम ब्लीचिंग पावडर
3. हायड्रोजन पॅरॉक्साइडची लहान बाटली (50% स्ट्रेंथची)

पाइप लाइन साफ करण्याची प्रोसेस

> पाइप लाइन साफ करण्यासाठी सर्वांत अगोदर टाकीत फक्त 3 ते 4 बादली पाणी ठेवा.
> आता पाण्यात हायड्रोजन पॅरॉक्साइडची लहान बाटली आणि 50 ग्रॅम ब्लिचिंग पावडर टाका.
> यानंतर एखाद्या काठीच्या आधारे 5 मिनिटांपर्यंत पाण्याला हलवा.
> यानंतर टाकीला जोडलेले सर्व चालू करा आणि पाण्याला बाहेर सोडा.
> नळातून ब्लिचिंग पावडरचा किंवा दुर्गंध आल्यावर नळ बंद करा. ही प्रक्रिया सर्व नळांसोबत करावी.
> टाकीत तयार झालेले सोल्युशन सर्व नळांपर्यंत पोहचेल आहे. ते रात्रभर नळांमध्येच राहू द्या.
> सकाळी सर्व नळ चालू करा, यामुळे ते सोल्युशन बाहेर निघून जाईल.
> यानंतर टाकीत 200 ते 300 लीटर स्वच्छ पाणी भरा आणि सर्व नळातून सोडून द्या.
> अशाप्रकारे टाकी आणि पाइप लाइन पूर्णपणे स्वच्छ होईल. त्यामध्ये सोल्युशनचा अंश राहणार नाही.
> आता सर्व नळांचे प्रेशर पहिल्यासारखा होईल. सोबतच जीवाणू आणि विषाणू नष्ट होतील.

नोट : ही प्रोसेस करताना मुलांना यापासून दूर ठेवा. सोबतच ते सोल्युशनचे पाणी कोणी वापरणार नाही याची दक्षता घ्या.

X