Home | Maharashtra | Vidarva | Akola | Clearing worker suicide in CEO's house

सीओंच्या घरात गळफास घेत सफाई कर्मचाऱ्याची आत्महत्या

प्रतिनिधी | Update - Aug 08, 2018, 12:33 PM IST

येथील नगर परिषदेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत राजू गंगाराम तेजवाल, वय ५३ वर्षे यांनी न. प. चे मुख्याधिकारी प्रमोद वानखड

  • Clearing worker suicide in CEO's house

    पातूर- येथील नगर परिषदेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत राजू गंगाराम तेजवाल, वय ५३ वर्षे यांनी न. प. चे मुख्याधिकारी प्रमोद वानखडे राहत असलेल्या शिक्षक कॉलनी येथील भाड्याच्या घरामध्ये मंगळवारी ७ ऑगस्टला सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घरातील स्वयंपाकखोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.


    या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार डी. सी. खंडेराव यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान या दुर्घटनेचे वृत्त लिहीपर्यंत त्या सफाई कर्मचाऱ्याचा मृतदेह विच्छेदनासाठी अकोला येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात पाठवला होता. तेजवाल यांच्या मागे तीन मुली, दोन मुले, आई, पत्नी असा आप्त परिवार आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.

Trending