आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Clients' Pockets Will Get Empty From Today; Mobile Bills Will Be Expensive

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजपासून ग्राहकांच्या खिशाला झळ; मोबाइल बिल महाग होणार

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : १ डिसेंबरपासून अनेक महत्त्वाचे बदल होत असून त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. याचा परिणाम सर्वसामान्य लोकांसह बँक ग्राहक आणि व्यावसायिकांवरही पडेल. डिसेंबरमध्ये अनेक वित्तीय बदल होत आहेत, ज्यांची माहिती जाणणे तुमच्यासाठी खूप आवश्यक आहे. यामध्ये एलआयसी, पंतप्रधान-शेतकरी सन्मान निधी योजना, मोबाइल शुल्क व इतर काही वस्तूंचा समावेश आहे. हे बदल जाणून घेऊया.

शुल्कवाढ होईल 


या वर्षाच्या अखेरीच्या महिन्याच्या पहिल्या तारखेस सर्वसामान्य लोकांच्या खिशाला जास्त झळ बसू शकते. १ डिसेंबरपासून मोबाइल फोन ग्राहकांसाठी कॉलिंगसोबत इंटरनेटचा वापरही महाग होईल. याचा अर्थ दूरसंचार कंपन्या टेरिफ प्लॅनचे दर वाढवण्याची तयारी आहे. दूरसंचार कंपन्या(आयडिया, व्होडाफोन, एअरटेल)नी याबाबत आधीच घोषणा केली आहे. दूरसंचार क्षेत्रातील जाणकारांनुसार, १४ वर्षे जुन्या अॅडजेस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू(एजीआर)च्या प्रकरणात सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर दूरसंचार कंपन्यांना देणे देण्यासाठी दबाव वाढला आहे. त्यामुळे कंपन्यांनी टेरिफ प्लॅनमध्ये दरवाढ करण्याची तयारी पूर्ण केली आहे.

आयुर्विम्याच्या नियमांत बदल


डिसेंबरमध्ये अायुर्विम्याबाबतच्या अनेक नियमांत बदल होणार आहे. त्यामुळे तुम्ही नवा विमा खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थोडी वाट पाहा. विमा नियामक व विकास प्राधिकरण, इर्डा १ डिसेंबरला आयुर्विमा क्षेत्रासाठी नवे नियम लागू करत आहे. आयडीबीआय फेडरल लाइफ इन्शुरन्सचे सीएमओ कार्तिक रमण यांच्या म्हणण्यानुसार, हप्ता महाग झाल्यास ग्राहकांना जास्त फीचर्सचा फायदा होईल.

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या प्लॅनमध्ये बदल

भारतीय आयुर्विमा महामंडळ १ डिसेंबर २०१९ पासून कंपनी आपल्या विमा योजना व प्रस्तावाच्या फार्ममध्ये मोठे बदल करत आहे. इर्डाचे नवे मार्गदर्शक तत्त्व लागू झाल्यानंतर एलआयसीचे प्रस्ताव अर्ज आता आधीपेक्षा जास्त लांब व सर्वंकश असतील. बदलांतर्गत देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आयुर्विमा महामंडळा(एलआयसी)नेही दोन डझनापेक्षा जास्त वैयक्तिक विमा पॉलिसी, आठ गट विमा योजना आणि सात ते आठ रायडर प्लॅनला ३० नोव्हेंबरपर्यंत बंद करण्याची घोषणा केली आहे. असे असले तरी एलआयसीने सांगितले की, ते भविष्यात हा विमा इर्डाच्या नियमांतर्गत पुन्हा लाँच करेल.

६००० रुपयांसाठी लिंकिंग आवश्यक

मोदी सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतील हप्ता प्राप्त करण्यासाठी आधार क्रमांकास लिंक करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर निश्चित केली आहे. एखाद्याने यात विलंब केल्यास शेतीसाठी ६ हजार रुपयांची मदत मिळणार नाही. मात्र, जम्मू-काश्मीर, लडाख, आसाम आणि मेघालयातील शेतकऱ्यांसाठी ३१ मार्च २०२० पर्यंत क्रमांक जोडण्याची संधी दिली आहे.