आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालंडन- हवामान बदलाचे होणारे परिणाम रोखण्यासाठी आखले जाणारे धोरण जगभरात लागू झाल्यास, जास्त कार्बन उत्सर्जित करणाऱ्या कंपन्यांना मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. कंपन्यांचे मूल्य ४३ टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. तर, कार्बन उत्सर्जन कमी केल्यास, कंपन्यांचे मूल्य ३३ टक्क्यांपर्यंत वाढू शकते. ही माहिती संयुक्त राष्ट्र संघाच्या प्रिन्सिपल्स फॉर रिस्पाॅन्सिबल इन्व्हेस्टमेंटच्या अहवालातून समोर आली आहे.
ज्या कार कंपन्या वेगाने, इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीच्या दिशेने वळत आहेत, त्यांचे मूल्य १०८ टक्क्यांपर्यंत वाढू शकते.नव्या नियमांमुळे ज्या कंपन्यांना सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यात कोळशाशी संबंधित कंपन्या आघाडीवर आहेत. या कंपन्यांच्या मूल्यांत ४४ टक्क्यांपर्यंत घट होईल. अक्षय्य ऊर्जेच्या दिशेने रणनीतीने काम करणाऱ्या इलेक्ट्रिक युटिलिटीज कंपन्यांचे मूल्य १०४ टक्क्यांपर्यंत वाढू शकते. खनिज खाणकामात गुंतलेल्या कंपन्या, अक्षय्य ऊर्जेकडे वळल्यास, त्यांना ५४♥% फायदा होऊ शकतो. नॉन ग्रीन मिनरल्सचे खाणकाम करणाऱ्या कंपन्यांच्या मूल्यांत ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट होऊ शकते. या बदलाचा कृषी क्षेत्रावरदेखील परिणाम होईल. शाश्वत जैवइंधन व बिगर गोमांस प्रथिनांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना १० %पर्यंत फायदा होईल. तर गोमांस व अशाश्वत ऊर्जेशी संबंधित कंपन्यांचे मूल्य १५ ते ४३ टक्क्यांनी कमी होऊ शकते.
प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांना विमा मिळवण्यात अडचण येईल, असा इशारा काही दिवसांपूर्वी बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर मार्क कार्नी यांनी दिला होता. अनेक कंपन्या कोळशाशी संबंधित ऊर्जा केंद्रास विमा देण्यास नकार देत आहेत. धोरणात बदल होण्याची शक्यता लक्षात घेऊन, विमा कंपन्यांनी हे पाऊल उचलले आहे. कोळसा खाणीशी संबंधित कंपन्यांना विमा न देण्याची घोषणा, अॅक्साने केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.