सोशल वर्क / पर्यावरणाच्या संरक्षणासाठी भूमी पेडणेकरने सुरू केले 'क्लायमेट वॉरियर' अभियान

भूमी लोकांना हवामान आणि वातावरणाशी जुळवून घेण्याविषयी सांगणार आहे

Sep 21,2019 11:25:00 AM IST

एंटरटेन्मेंट डेस्क : कंगना रनोटनंतर आता भूमी पेडणेकरदेखील पर्यावरण संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात मोहीम राबवणार आहे. कंगनाने कावेरी काॅलिंग मोहीममध्ये भाग घेतला होता. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला होता. आता भूमीनेदेखील क्लायमेट वॉरियर नावाची मोहीम सुरू केली आहे. ती म्हणते..., 'इतर देशांप्रमाणेच भारतालाही हवामान बदलांचे सखोल परिणाम भोगावे लागत आहेत. देशात कधी पूर येतो तर कुठे भयंकर दुष्काळ पडतो किंवा पृथ्वीचे वाढते तापमान असो... या सर्व गोष्टी मानवी जीवनासाठी धोकादायक आहेत. एवढेच नव्हे तर वर्षानुवर्षे त्यात वाढ होत चालली आहे. त्यामुळे हवामान बदल आणि पर्यावरण संरक्षणाविषयी जनजागृती करण्यासाठी तिने 'हवामान वॉरियर' नावाची मोहीम सुरू केली आहे. क्लायमेट वॉरियर हा एक सोशल मीडिया आणि ऑनलाइन उपक्रम आहे. भूमी लोकांना हवामान आणि वातावरणाशी जुळवून घेण्याविषयी सांगणार आहे.

X