आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अध्यक्षपदाचा तणाव दूर करण्यासाठी मोनिकाशी ठेवले संबंध, तेव्हा कुटुंब आणि देशाचा विचारही केला नव्हता : क्लिंटन

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - व्हाइट हाऊसमधील वास्तव्याच्या काळात माेनिका लेवेन्स्कीवर प्रेम जडले होते, अशी कबुली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी तब्बल २५ वर्षांनंतर दिली. मोनिकामुळे अध्यक्ष म्हणून सतत येणारा तणाव दूर होण्यास मदत झाली, असे त्यांनी म्हटले. क्लिंटन यांनी अनेक खासगी बाबींचा उल्लेख ‘हिलरी’ या माहितीपटात केला आहे. त्यांनी प्रथमचया प्रकरणावर उघडपणे बाजू मांडली. कुटुंब, लग्न व देशाची जबाबदारी असताना इतकी मोठी जाेखीम का पत्करली, अशी विचारणा केली असता, याचा मी िवचारच केला नाही. व्हाइट हाऊसच्या दबावामुळे विचलित झालो होतो, असे ते म्हणाले. 

१८ वर्षीय मुलीसमोर अफेअर मान्य करणे खूप लाजिरवाणे
बिल क्लिंटन यांनी म्हटले, व्हाइट हाऊसमध्ये काम करणाऱ्या मोनिकाची व माझी भेट मी कामाच्या प्रचंड व्यापाखाली दबलेला होतो तेव्हा झाली.  हीच केवळ माझ्या डोक्यात सुरू असलेल्या अनेक विचारांना काही वेळ शांत करू शकते असे मला तेव्हा वाटले.  मोनिकामुळे मला दबावाचा सामना करण्यास मदत मिळाली. अनेकदा तुम्ही चोहोबाजूने घेरले गेलेले असाल आणि १५ राउंड प्राइजच्या फाइटसाठी लढत असता तेव्हा ती फाइट ३० राउंडची करण्यात अाल्याचे तुम्हाला समजते. त्या वेळी कामाचा दबाव इतका प्रचंड होता की, एखादा मुष्टियोद्धा ३० राउंड खेळूनही पराभूत झाल्यासारखे वाटत होते. त्याक्षणी मोनिका माझ्या आयुष्यात दिलासा देणारी ठरली. हिलरीला माझ्या अफेअरबद्दल सगळे सांगितले होते, पण माझ्या या अफेअरची कबुली माझ्या १८ वर्षीय मुलीसमोर दिली हे खूप लाजिरवाणे होते. 

पूर्णत: उद्ध्वस्त झाले होते : हिलरी
िबलच्या पत्नी हिलरी यांनीही या स्कँडलनंतर मी पूर्णत: उद्ध्वस्त झाले होते, असे म्हटले. आमचे संबंध तुटण्याची वेळ आली होती. मला समुपदेशकाकडे जावे लागले होते. हे प्रकरण उघड झाल्यानंतर आम्ही सुटीवर गेलो. परतल्यानंतर हिलरींनी पतीच्या बाजूने उभे राहण्याचे ठरवले. 

महाभियाेगपासून वाचले :  या स्कँडलमुळे  १९९८ मध्ये बिल यांना महाभियोगास सामाेरे जावे लागले होते, पण त्यातून ते बचावले. त्यांनी अध्यक्षपदाचा दुसरा कार्यकाळही पूर्ण केला.