आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Clock Now Combines Fashion And Personal Accessories With Time consuming Viewing, So Over Two Million New Jobs Are Created In Three Years.

घड्याळ आता वेळ पाहण्यासह फॅशन व पर्सनल अॅसेसरीजचा हिस्सा, त्यामुळे तीन वर्षांत 20 लाख नवीन राेजगार निर्मिती

2 वर्षांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
  • पर्सनल अॅसेसरीजमध्ये वार्षिक 15%ची वाढ, गेल्या वर्षी 4 कोटी टाइम विअर तयार, 2 वर्षांत 7 कोटी युनिटची निर्मिती होईल
  • डेटा अॅनालिटिक्स, डिजिटल मार्केटिंग व ई-कॉमर्समध्ये नव्या नोकऱ्यांच्या संधी

​​​​​​नवी दिल्ली : पर्सनल अॅसेसरीजचा व्यवसाय वार्षिक १५% वाढीवर जात आहे. घड्याळासह विअरेबल्स बाजारपेठेत ३ वर्षात २० लाख नव्या नोकऱ्या येऊ शकतात. नोकरी आणि करिअर वाढीवरून दैनिक भास्करने टायटनचे सीएचआरओ व सीनियर व्हाइस प्रेसिडेंट आर. राजनारायण यांच्याशी चर्चा केली.

तुमची कंपनीत सध्या कोणत्या प्रकारच्या कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असते?


सध्या आम्ही घड्याळे, ज्वेलरी आणि प्रिस्क्रिप्शन आयवियरच्या क्षेत्रात मार्केट लीडर आहे. अॅसेसरीज, फ्रेगरेन्स आणि फॉर्मल इंडियन ड्रेसविअरमध्ये खूप बळकटीने पुढे जात आहे. आम्हाला डिझाइन, उत्पादन विकास, मॅन्युफॅक्चरिंंग, सोर्सिंग, सप्लाई सिरिज मॅनेजमेंट, मार्केटिंग, सेल्स, रिटेल आणि विक्रीनंतर ग्राहक सेवेत कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते.

फ्रेशर्स आणि अनुभवी व्यावसायिकांसाठी रोजगाराच्या कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात?


आम्ही नियमित पद्धतीने विविध कँम्पस कार्यक्रमाच्या माध्यमातून फ्रेशर्सची भरती करतो. मॅनेजमेंट ट्रेनी(एमबीए,सीए), ग्रॅच्युएट इंजीनिअर ट्रेनी, डिझाइन ट्रेनी, सुपरवायजर ट्रेनी(डिप्लोमाधारक), ग्रॅच्युएट ट्रेनी(विज्ञान वा कलेचे पदवीधारक) व अॅप्टोमेट्रिस्ट ट्रेनीला फ्रेशर्स म्हणून संधी देतात.

मुलाखतीसाठी कोणत्या गोष्टींवर लक्ष दिले पाहिजे?


उमेदवार ज्या पदासाठी अर्ज करत आहेत, त्याला त्याची पूर्ण माहिती असायला हवी. व्यवसाय व संबंधित कंपनीवरही संशोधनासारखी तयारी केली पाहिजे. उमेदवारास आपले अनुभव व तज्ज्ञाची उपयुक्तता माहीत हवी.

नोकरीसाठी उमेदवार कसा अर्ज करू शकतात?


भरती कार्यक्रमांसाठी कंपनी थेट महाविद्यालये व संस्थांत जातात. अनुभवी व्यावसायिक आमच्या वेबसाइटवर रिक्त जागा पाहू शकतात.

कंपनी कर्मचाऱ्यांच्या उद्यमशीलतेस प्रोत्साहन देते ?


टायटन आपल्या कर्मचाऱ्यांना कुण्या अन्य संघटनेत लाभदायक रूपाने काम करण्याची परवानगी देत नाही. टायटन कर्मचाऱ्यांना आपल्या रिटेल आऊटलेट्सची फ्रँचाइझी घेण्याची संधी देते. फ्रँचायझी घेतल्यानंतर ते कर्मचारी राहत नाहीत.

काही वर्षांत भरती प्रक्रिया बदलली आहे?


व्हर्च्युअल मुलाखतीने भरती प्रक्रिया बदलली आहे. यामुळे कंपन्यांना मोठ्या टॅलेंट पूलमध्ये उपयुक्त प्रतिभा शोधण्यात मदत मिळेल. उमेदवारांना चांगल्या पद्धतीने ओळखणे आणि अचूक निर्णय घेण्यात आमची मदत करण्यासाठी आता मूल्यांकन करणारी पद्धती व उपकरणेही आली आहेत. आता एआय व बिग डेटातून अशा संधी मिळतात ज्यात आधी अशा शक्यता नव्हत्या.

सध्या कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या आहेत?
 
अाता डिजिटल मार्केंटिंग, डेटा अॅनालिटिक्स व ईकॉमर्समध्ये खूप साऱ्या संधी आहेत. तरीही सेल्स, मार्केटिंग, डिझाइन आणि मॅन्युफॅक्चरिंगसारखे कामे नेहमी राहतील. मात्र, नव्या तंत्रज्ञान आल्याने यामध्ये काम करण्याची पद्धती आवश्यक बदलेल आणि त्यानुसार नव्या संधी उपलब्ध होतील. टायटनचे उत्पादन थेट लोकांशी जोडले आहे. अर्थव्यवस्थेच्या विस्तारासोबत या उत्पादनांची मागणी वाढत आहे.

१५ टक्क्यांच्या वृद्धीदराने वाढतोय पर्सनल फॅशन अॅसेसरीजचा व्यवसाय
 
आयबीईएफच्या अहवालानुसार, भारतात सध्या पर्सनल फॅशन अॅसेसरीजची पोहोच ५०% लोकांपर्यंत आहे. म्हणजे, सध्या वृद्धीची शक्यता आहे.


टाइम विअर, आय विअर व ज्वेलरीचा व्यवसाय २० अब्ज डॉलरचा आहे. हे वर्ष २०२२ पर्यं २५ अब्ज डॉलरची होईल.
पर्सनल अॅसेसरिजला सरासरी १५ टक्क्याचा वृद्धी दर मिळत आहे. यामुळे येत्या ३ वर्षांत २० लाख नव्या नोकऱ्या येतील.
निर्यातही सतत वाढत आहे. सन २०२४ पर्यंत निर्यातीचा आकडा १५ हजार कोटी डॉलरपर्यंत होऊ शकते.


गेल्या पाच वर्षांत १५ पेक्षा जास्त युरोपीय कंपन्यांनी भारतीय बाजारपेठ ठोठावली आहे. २०२१ पर्यंत ८ आणि कंपन्या भारतात येण्याची शक्यता आहे.

या क्षेत्रातील रोजगार
 
- ऑप्टोमेट्रिस्ट 
- सप्लाय सिरीज मॅनेजमेंट 
- मार्केटिंग 
- सेल्स 
- रिटेल 
- मॅन्युफॅक्चरिंग 
- कस्टमर सर्व्हिस 
- लॉजिस्टिक्स 
- प्रॉडक्शन 
- प्लांट सुपरवायझर 
- डिझाइन प्रोडक्शन 
- मॅनेजमेंट 
- क्वालिटी कंट्रोल
- फॅशन 
- अॅसेसरीज डिझाइन 
- ब्रँड प्रमोशन 
- कॉस्च्यूम डिझायनर 
- फॅशन कन्सल्टंट 
- टेक्निकल डिझायनर 
- ग्राफिक डिझायनर 
- प्रॉडक्शन पॅटर्न मेकर 
- को-अॉर्डिनेटर


आर राजनारायण, सीएचआरओ, सीनियर व्हाइस प्रेसिडेंट, टायटन

 

बातम्या आणखी आहेत...