आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गृहरक्षक दलातील ४० हजार जवानांच्या कर्तव्यावर संक्रांत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • निधी नसल्याचे कारण दाखवत जवानांचा बंदोबस्त बंद
  • महासमादेशकांच्या पत्रामुळे जवानांना बसावे लागले घरी

हिंगोली - राज्यात पोलिसांच्या खांद्याला खांदा लाऊन कायदा व सुव्यवस्था व इतर सण, उत्सवाच्या काळात ब‌ंदोबस्त करणाऱ्या सुमारे चाळीस हजार जवानांच्या कर्तव्यावर संक्रांत आली आहे. गृहरक्षक दलाच्या महासमादेशक कार्यालयातून शुक्रवारी (ता.१०) काढण्यात आलेल्या आदेशामुळे जवानांवर उपासमारीची वेळ येणार आहे. 

राज्यात गृहरक्षक दलाचे सुमारे चाळीस हजार जवान कार्यरत आहेत. या जवानांना पूर्वी सण, उत्सव व कायदा व सुव्यवस्थेच्या काळातच कर्तव्य दिले जात होते. त्यामुळे इतर काळात जवानांना कधी रोजमजुरी तर काही जवानांना रिक्षा चालवून उदरनिर्वाह करावा लागत होता. जवानांची ही अडचण लक्षात घेता युती शासनाने जवानांना १८० दिवस कायम बंदोबस्त देण्याचा निर्णय घेतला होता. त्याची अंमलबजावणी देखील अाॅगस्ट २०१९ पासून सुरु झाली होती. यामध्ये महासमादेशक कार्यालयाकडून आॅनलाइन क्रमांक देऊन जवानांना कर्तव्य दिले जात होते. कर्तव्यावर असलेल्या जवानांना ६७० रुपये रोज मानधन दिले जात होते. प्रत्येक जिल्ह्यातील जवानांना १८० िदव्स बंदोबस्त येईल, असे नियोजन केले होते. 
मात्र महासमादेशक कार्यालय मुंबई यांनी नुकतेच राज्यातील सर्व जिल्हा समादेशकांना पत्र पाठवले आहे. शासनाकडून निधी मिळाला नसल्याने सदर बंदोबस्त स्थगित ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर शासनाकडे निधीबाबत पाठपुरावा सुरू असल्याचेही पत्रात नमूद केले आहे. महासमादेशकांच्या पत्रामुळे जवानांना बसावे लागले घरी
 
या पत्रानुसार राज्यात समादेशकांनी कर्तव्यावर असलेल्या जवानांना तातडीने कर्तव्यावरून काढले आहे. त्यामुळे राज्यभरातील सुमारे चाळीस हजार जवानांच्या कर्तव्यावर संक्रांत आली आहे. आता पुढील काळात १८० िदव्स बंदोबस्त मिळणार की नाही याबाबतही संभ्रम आहे. या प्रकारामुळे जवानांमधून तीव्र नाराजीचा सूर उमटू  लागला आहे. महासमादेशक कार्यालयाने काढलेल्या या आदेशामुळे जवानांनावर उपासमारीची वेळ येणार असून सदर आदेश तातडीने रद्द करून जवानांना कर्तव्य द्यावे, अशी मागणी केली जात आहे.