Home | Maharashtra | Kokan | Thane | cm announces to increase bal thakareys security

बाळासाहेब ठाकरे यांच्या सुरक्षेत आणखी वाढ - मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

agency | Update - May 27, 2011, 11:54 PM IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात येईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

  • cm announces to increase bal thakareys security

    शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात येईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

    26/11 च्या मुंबई हल्ल्यातील सहआरोपी डेव्हिड हेडली याने शिकागो न्यायालयात मातोश्री बंगल्याची पाहणी केल्याचे कबूल केले होते. त्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सुरक्षेचा मुद्दा स्पष्ट केला. हेडलीच्या कबुलीजबाबाची माहिती सरकारला मिळाली आहे. याबाबत आम्ही आता विस्तृत अहवालाची प्रतीक्षा करीत असल्याचेही त्यांनी पत्रकारांना सांगितले.

    आयटीबीपीने पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याच्या सुरक्षेचा 11 कोटी रुपयांचा खर्च राज्य सरकारकडे मागितला आहे. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, या संदर्भात केंद्र सरकारशी चर्चा केली जाईल. राज्य सरकार कसाबच्या सुरक्षेचा खर्च उचलण्यास तयार आहे.

    चव्हाण यांनी मनपा-नपा निवडणूक प्रभाग पद्धतीने करण्याच्या निर्णयाचे समर्थन करीत, हा निर्णय योग्य असल्याचे सांगितले. ते म्हणाले, सरकारमधील दोन्ही पक्षांत कुठलेही मतभेद नाहीत. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी एखाद्या कार्यक्रमात एकत्रच सहभागी व्हावे, असे आवश्यक नसते.Trending