आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामलल्लाच्या कृपेने महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर संजय राऊतांची प्रतिक्रीया

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'आम्हाला रामलल्लाचा प्रसाद मिळाला असं आम्ही मानतो'

मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या (7 मार्च) अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. त्यांच्यासोबत सोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे असतील. "उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद म्हणजे रामाचा प्रसाद आहे. रामलल्लाच्या कृपेनेच उद्धव ठाकरे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले आहेत", अशी प्रतिक्र्यी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली. राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधला.


यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, "भगवान श्री रामाच्या कृपेनेच महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झाला आहे. आम्ही रामलल्लाचा प्रसाद मिळाला असं मानतो. उद्या उद्धव ठाकरे हे प्रथम लखनौला येतील. त्यानंतर ते अयोध्येला जातील. तिथे शरयू तिरावर आरतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पण काल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा झाली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गर्दीचे कार्यक्रम टाळण्याचा निर्णय झाला आहे." 


"यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि काही नेते मंडळीही त्या ठिकाणी येतील. अयोध्येत शांतता राहावी, तसेच मंदिर उभारणीतही शिवसेना सहभागी होऊ इच्छिते, त्याबाबत मुख्यमंत्रीच माहिती देतील. त्यांच्या दौऱ्याला कोणाचाही विरोध नाहीय. देशातील सर्वांनी रामलल्लाचं दर्शन घ्यावं अशी आमची इच्छा आहे. हा पूर्णपणे धार्मिक कार्यक्रम असेल. यात कोणतंही राजकारण करण्याची गरज नाही," असंही त्यांनी यावेळी नमुदं केलं.
 

बातम्या आणखी आहेत...