आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्यमंत्र्यांच्या मागे पुन्हा हेलिकाॅप्टरची 'साडेसाती'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायगड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामागची हेलिकाॅप्टर साडेसाती काही संपण्याचे नाव घेत नाही. शुक्रवारी रायगड जिल्ह्यातील पेण येथे प्रचारसभेसाठी मुख्यमंत्री गेले हाेते. सायंकाळी साडेचारच्या सुमारास लँड हाेत असताना त्यांच्या हेलिकाॅप्टरची चाके मातीत रुतली, त्यामुळे काही क्षण पायलटचे हेलिकाॅप्टरवरील नियंत्रण सुटले. सुदैवाने पायलटने तातडीने पुन्हा हेलिकाॅप्टरवर नियंत्रण मिळवल्याने काेणतीही दुर्घटना घडली नाही.

काही वेळातच याच हेलिकाॅप्टरने फडणवीस यांच्यासह पाच जण उल्हासनगरकडे रवाना झाले. हेलिगो चार्टर कंपनीचे हे हेलिकाॅप्टर हाेते. यापूर्वीही लातूरसह अन्य दाेन- तीन ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या हेलिकाॅप्टरची दुर्घटना झाली हाेती, सुदैवाने तिथेही काेणाला इजा झाली नव्हती. दरम्यान, पेणच्या घटनेत काेणताही अनुचित प्रकार घडला नाही. जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये, असे अावाहन भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केले अाहे.
 

बातम्या आणखी आहेत...