आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांचा दोंडाईचा दौरा, धर्मा पाटलांच्या मुलावर प्रतिबंधात्मक कारवाई, मंत्रालयात प्राशन केले होते विष

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्या करणारे धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. सायंकाळी मुख्यमंत्री रवाना झाल्यानंतर नरेंद्र पाटील यांना सोडण्यात आले.   

 

दोंडाईचापासून जवळ असलेल्या विखरण येथील धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्या केली होती. त्यामुळे संपूर्ण राज्यात हा विषय गाजला होता. बुधवारी मुख्यमंत्री देवेंद फडणवीस हे धुळे दौऱ्यावर आले होते. सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आटोपल्यानंतर मुख्यमंत्री दोंडाईचाला रवाना झाले. दोंडाईचातील कार्यक्रमाच्या वेळी धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील याच्यामुळे गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. त्यानंतर दोडाईचा पोलिस स्टेशनमधील ठाणे अंमलदार कक्षाजवळ त्यांना बसवून ठेवण्यात आले होते. सीआरपीसी 68 नुसार ही कारवाई करण्यात आली. परंतु यानंतर नरेंद्र पाटील यांच्या पश्चात त्यांचे कुटुंबीयही आले. पोलिसांनी नरेंद्र पाटीलव्यतिरिक्त कोणालाही ताब्यात घेतलेले नाही. तसा दावा पोलिसांनी केला आहे. दरम्यान, दुपारी मुख्यमंत्री फडणवीस यांचा कार्यक्रम आटोपल्यानंतर नरेंद्र पाटील यांना सीआरपीसी 69 नुसार लागलीच त्यांची सुटका करण्यात आली, अशी माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे.   

 

कायद्याच्या चौकटीतून कारवाई    
कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने कायदेशीर चौकटीत राहून नरेंद्र पाटील यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. शिवाय त्यांना पोलिसांजवळ बसवून ठेवण्यात आले होते. पाटील कुटुंबातील कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही. दौरा संपल्यानंतर पुन्हा त्यांना सोडण्यात आले.    
- भगवान मथुरे, पोलिस निरीक्षक, दोंडाईचा पोलिस स्टेशन

बातम्या आणखी आहेत...