औरंगाबादेत मुख्यमंत्र्यांचे पित्त / औरंगाबादेत मुख्यमंत्र्यांचे पित्त खवळले..पित्तनाशक गोळ्या घेऊन मुख्यमंत्री मुंबईकडे, प्रकृती बिघडल्याचे वृत्त निराधार CMO ची माहिती

Feb 14,2019 07:12:00 PM IST

औरंगाबाद/मुंबई- बुलढाण्याहून येताना मुख्यमंत्र्यांची तब्बेत बिघडल्याची अफवा गुरुवारी दुपारी पसरली होती. परंतु प्रत्यक्षात त्यांचे पित्त खवळले (अॅसिडीटी) होते. सकाळपासूनच त्यांना मळमळ होत होती. बुलढाणा येथेच त्यांना उलटी झाली. औरंगाबाद विमानतळावर आल्यानंतर त्यांनी ही पित्तनाशक गोळ्या घेतल्या आणि त्यानंतर ते मुंबईला रवाना झाल्याचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.भागवत कराड यांनी सांगितले.

मुख्यमंत्री विमानतळावर पंधरा मिनिटे थांबले होते. प्रकृती ठिक नसल्याने ते थांबल्याची अफवा होती. परंतु त्यांच्या विमानाला मुंबई विमानतळावर उतरवण्यासाठी परवानगी उशिराची मिळाल्याने ते येथे थांबले होते, असे प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी सांगितले. पक्षाच्या वतीने अधिकृतपणे असा खुलासा करण्यात आला. सोशल मीडियावर मात्र दुपारपासूनच अफवांची पिक होते. ते शहरातील एका हॉटेलात थांबल्याचीही अफवा पसरवण्यात आली. त्यामुळे भाजपच्या काही कार्यकर्त्यांना जालना रोडवरील एका पंचतारांकित हॉटेलात धाव घेतली. प्रत्यक्षात तसे काहीच नव्हते.

प्रकृती बिघडल्याचे वृत्त निराधार- केतन पाठक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकृती अचानक बिघडली. औरंगाबादमध्ये प्राथमिक उपचार करून त्यांना हेलिकॉप्टरने मुंबईला रवाना करण्यात आले आहे. ही अफवा पसवविली जात आहे. मुख्यमंत्र्याची प्रकृती बिघडल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे ओएसडी (Officer on Special Duty) केतन पाठक यांनी स्पष्‍ट केले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री गुरुवारी औरंगाबादेत आले. ते बुलडाण्याहून वाशिमकडे रवाना झाल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना दौरा अर्धवट सोडावा लागला, असे वृत्त काही वृत्त वाहिन्यांनी दिले. मुख्यमंत्र्यांवर औरंगाबाद येथे प्राथमिक उपचार करून त्यांना तातडीने मुंबईला हलविण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. मात्र, ही माहिती चुकीची आणि पूर्णपणे निराधार असल्याचे केतन पाठक यांनी सांगितले आहे.

X