आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

: फडणवीसांची संपत्ती 3.78 काेटी; तर अजित पवारांंकडे 3.11 काेटी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघात शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.  प्रतिज्ञापत्रात आपली स्थावर मालमत्ता ३.७८ कोटी रुपये नमूद केली आहे. तर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतून उमेदवारी अर्ज दाखल करताना ३.११ काेटी रुपयांच्या मालमत्तेचे शपथपत्र दिले.

  • मुख्यमंत्र्याविरुद्ध चार तक्रारी, मात्र गुन्हे नाही

नागपूर | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दक्षिण-पश्चिम नागपूरमधून उमेदवारी दाखल केली. प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपली स्थावर मालमत्ता ३.७८ कोटी नमूद केली आहे. २०१४ मध्ये ती १.८१ कोटी रुपये होती. तर पत्नी अमृता यांच्या स्थावर मालमत्तेचे ९९.३ लाख रुपये इतके आहे.

  • अजितदादांपेक्षा सुनेत्रा वहिनींचे उत्पन्न पाचपट

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शुक्रवारी बारामतीतून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रतिज्ञापत्रानुसार अजित पवार यांचे वार्षिक उत्पन्न ६२ लाख ४८ हजार रुपये आहे. त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांचे वार्षिक उत्पन्न ३ काेटी २३ लाख ८६ हजार रुपये असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

बातम्या आणखी आहेत...