सत्ता संघर्ष / माझ्यासमोर अडीच वर्ष सत्ता वाटपाचा कधीच विषय झाला नाही, पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांचा सेनेवर घणाघात

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यपालांकडे सोपवला राजीनामा

दिव्य मराठी वेब टीम

Nov 08,2019 05:39:31 PM IST

मुंबई- राज्यातील सत्तेचा पेच सुटायचे नावच घेत नाहीये. शिवसेना मुख्यमंत्री पदाच्या मागणीवर ठाम असून सेनेच्या सर्व आमदारांनी यासंबंधाचे सर्व अधिकार पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना दिले आहेत. दोन्ही पक्ष मुख्यमंत्री पद सोडण्यास तयार नसल्याने सत्तास्थापनेचा तिढा अजुनही सुटलेला नाहीये. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सोपवला आहे. त्यानंतर ते सह्याद्री अतिथीगृहात पत्रकार परिषद घेत आहेत.

50-50 सत्ता वाटपाचा फॉर्म्युला माझ्यासमोर कधीच ठरलेला नाही. अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर आमची बोलणी फिस्कटली होती त्यानंतरच्या माझ्यासमोरच्या एकाही चर्चेत हा विषय झाला नाही. उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात जर विषय झालेला असेल तर मला माहित नाही. पण, मी तसं अमित शाह आणि नितीन गडकरी यांना विचारलं मात्र त्यांनीही असं काहीही ठरलेलं नसल्याचं सांगितलं.

मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेमधील महत्वाचे मुद्दे..

> 5 वर्षे सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्वांचेच आभार

> आमच्या सोबत असलेल्या शिवसेनेचेही आभार

> पाच वर्षात वेगवेगळ्या योजना राबवल्या

> शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहण्याचे काम राज्य सरकारने केले

> राज्यात सर्वात जास्त इन्फ्रास्ट्रक्चरचं काम झालं

> गेल्या पाच वर्षात विलक्षण विकास झाला

> राज्याच्या सर्व समस्या संपणार नाहीत, पण बऱ्यापैकी काम झालं

> जे प्रकल्प प्रलंबित होते, ते मार्गी लावले

> राज्याने लोकसभेत प्रचंड बहुमत दिलं

> पाच वर्षात केलेल्या कामाची पावती जनतेने दिली

> शिवसेनेचा आमचे सर्व पर्याय खुले आहेत, ऐकुन धक्का बसला

> माझ्या समोर अडीच वर्षा सत्ता वाटपाचा कधीच विषय झाला नाही

> अमित शहांनी कोणताही शब्द दिला नसल्याचे सांगितले

> उद्धव ठाकरेंनी माझे फोन घेतले नाहीत

> चर्चा आम्ही नाही तर, शिवसेनेेने थांबवली

> राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सेनेने चर्चा केली, आमच्यासोबत कधीच केली नाही

> संजय राऊतांवर अप्रत्यक्ष टोला

> आमच्या सोबत राहून, आमच्याच नेत्यावर टीका करण्यात आल्या

> सरकार स्थापन होणं गरजेचं आहे

> नवीन सरकार स्थापन होईपर्यंत मलाच राज्यपालांनी मुख्यमंत्रीपद सांभाळण्यास सांगितले>

> आमदार फोडत असल्याचा पुरावा सादर करावा, अन्यथा माफी मागावी

X
COMMENT