आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • CM Devendra Fadnavis Launch 'Khelo India Application'

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खेलो इंडिया युथ गेम्स अ‍ॅपचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यामध्ये खेलो इंडिया युथ गेम्सचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे मंत्रालयात खेलो इंडिया अ‍ॅप, स्पर्धेसाठी खास बनविण्यात आलेल्या टीव्हीसी (चित्रफीत) आणि जिंगलचे अनावरण करण्यात आले. दिनांक ९ ते २० जानेवारी २०१९ दरम्यान महाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरी येथे १८ क्रीडाप्रकारात ही स्पर्धा होणार आहेत. इंडिया उपक्रमाचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. खेलो इंडिया स्पर्धा दिनांक ९ ते २० जानेवारी २०१९ या कालावधीत पुण्यात रंगणार आहे.