आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत बदल, रविवारचे कार्यक्रम स्थगित, शनिवारी कुठलेही भाषण नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तसेच माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे शनिवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा रविवार, 24 ऑगस्ट रोजी स्थगित केली आहे. मुख्यमंत्री शनिवारी यात्रेसाठी मूळ कार्यक्रमानुसार ठिक-ठिकाणी जमलेल्या लोकांना भेटत आहेत. परंतु, या भेटींदरम्यान कुठल्याही भाषणाचा कार्यक्रम होणार नाही. सोबतच, भेट घेताना मुख्यमंत्री पुष्प सुद्धा स्वीकारणार नाहीत. मुख्यमंत्र्यांचे यात्राप्रमुख प्रदेश सरचिटणीस आमदार सुजित सिंह ठाकूर यांनी ही माहिती दिली.

सुजितसिंह ठाकूर यांनी सांगितले की, अरुण जेटली यांच्या निधनाचे वृत्त समोर आले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अरुण जेटली यांना श्रद्धांजली अर्पण करून यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी केवळ लोकांना भेटतील. पण कुठेही स्वागताचे कार्यक्रम होणार नाहीत तसेच हारफुले स्वीकारण्यात येणार नाहीत. महाजनादेश यात्रा रविवारी पूर्णपणे स्थगित करण्यात आली आहे. सोमवारी मूळ कार्यक्रमानुसार पाथर्डी येथून यात्रा पुढे जाईल. जेटलींना 9 ऑगस्ट रोजी दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सॉफ्ट टिश्यू कॅन्सरवर उपचार घेणाऱ्या जेटलींना श्वास घेण्यात अडथळा आला होता. त्यांना जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते. परंतु, डॉक्टरांना त्यांचा जीव वाचवता आला नाही.
 

बातम्या आणखी आहेत...