आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांनी राजकीय वारं ओळखून निवडणुकीतून घेतली माघार, युतीचा मोठा विजय, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. काही दिवसांपूर्वी पवारांनी माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली होती. परंतु सोमवारी त्यांनी कौटुंबिक पातळीवर निवडणुकीतूनच माघार घेत असल्याचे जाहीर केले. पवारांच्या या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणजे, शरद पवारांची लोकसभा निवडणुकीतून माघार म्हणजे भाजप-शिवसेना युतीचा पहिला विजय आहे. राजकीय वारं ओळखून पवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

 

मुख्यमंत्री म्हणाले की, शरद पवारांना बदललेल्या हवेचा लवकर अंदाज येतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी एकदा म्हणाले होते. त्यानुसारच पवारांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

 

नवी पीढी राजकारणात उतरणार..
नवी पीढी आता राजकारणात उतरणार असल्याचे सांगत शरद पवार यांनी सोमवारी पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर केली. पार्थ पवार हे अजित पवार यांचे चिरंजीव असून त्यांना मावळमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मावळ मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. त्याचबरोबर मावळमध्ये अज‍ित पवारांचे समर्थकही मोठ्या प्रमाणात आहेत.

बातम्या आणखी आहेत...