Home | Maharashtra | Pune | CM Devendra fadnavis Says we will fight lok sabha all seats in Maharashtra

बारामतीत यंदा 'कमळ' फुलणार.. मुख्यमंत्र्यांचे शरद पवारांना थेट आव्हान, महाराष्ट्रात 48 जागांवर लढणार- मुख्यमंत्री

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 09, 2019, 04:23 PM IST

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 48 जागांवर लढणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

  • CM Devendra fadnavis Says we will fight lok sabha all seats in Maharashtra

    पुणे- बारामतीत यंदा कमळ फुलणार आहे. मागील वेळेस थोडक्यात हुकलेला विजय यंदा भाजप मिळवणार आहे. यासाठी पूर्ण ताकद लावण्यात येईल. राज्यातील 48 जागावर मेहनत घेवून उमेदवार निवडून आणणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुण्यात व्यक्त केला.

    पुण्यातील भाजपच्या बूथ प्रतिनिधी मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 48 जागांवर लढणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. या मेळाव्यास भाजपचे अध्यक्ष अमित शहा, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित आहेत

Trending