Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | CM Fadanvis said that congress didn't removed poverty in last 60 years

पणजोबा-आजोबांपासून नाराही हटला नाही आणि गरिबीही; काँग्रेसची गरिबी मात्र दूर! मुख्यमंत्री फडणवीसांचा पाथरीत काँग्रेसवर हल्ला

प्रतिनिधी | Update - Apr 13, 2019, 10:35 AM IST

रावणगिरी चालू दिली नाही, डॉनगिरीला तर केव्हाच संपवू, आम्ही पण दबंग आहोत - मुख्यमंत्र्यांचा इशारा

 • CM Fadanvis said that congress didn't removed poverty in last 60 years

  परभणी - पणजोबा, आजोबांपासून आजपर्यंत काँग्रेसने गरिबी हटावचा केवळ नाराच देण्याचे काम केले आहे. त्यांचा नाराही हटला नाही, गरिबी तर हटणे दूरचेच राहिले. गरिबी हटावच्या नावाखाली काँग्रेसच्या नेतेमंडळीसह त्यांच्या चेल्याचपाट्यांची मात्र गरिबी दूर झाली, अशी घाणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी(दि.12) पाथरीत केली.


  पाथरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर युतीचे उमेदवार खा.संजय जाधव यांच्या प्रचारार्थ आयोजित विजय संकल्प सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोदी सरकारने केलेल्या विविध योजनांचा पाढा वाचताना काँग्रेसवर कडाडून टीका केली. व्यासपीठावर उमेदवार खा.जाधव, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, आ.मोहन फड, आ.डॉ.राहुल पाटील, माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर, माजी आ. विजयराव गव्हाणे, जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, अभय चाटे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेश ढगे, मेघना बोर्डीकर, गणेशराव रोकडे, विठ्ठल रबदडे, समीर दुधगावकर, राजश्री जामगे, उद्धव नाईक आदींची उपस्थिती होती.

  मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, गेल्या ६० वर्षात काँग्रेसने गरिबांची थट्टाच करण्याचे काम केले असून आता पुन्हा गरिबी हटावचा नारा देत निवडणुकीत लोकांना ७२ हजार प्रतिमाणसी देण्याचे आश्‍वासन दिले जात आहे. मात्र मोदी सरकारने गेल्या पाच वर्षांच्या काळात गरिबांना जनधन योजनेच्या माध्यमातून बँकिंग प्रवाहात आणत त्यांची खाती उघडली. ३४ कोटी गरीब जनतेला खाती मिळून त्यांच्या खात्यावर विविध योजनांचे पैसे जमा करताना मध्यस्थ व दलालांना संपवण्याचे काम केले आहे. शेतकरी, कष्टकरी व गोरगरिबांना या माध्यमातून आधार देण्याचे काम सरकारने केले आहे, असेही नमूद केले. या वेळी पाणीपुरवठ मंत्री श्री लोणीकर,आ.मोहन फड,उमेदवार खा.जाधव, श्री रबदडे, राजश्री जामगे, प्रा.पी.डी.पाटील, रवींद्र धर्मे, डॉ.उमेश देशमुख आदींचीही भाषणे झाली.

  डॉनगिरी चालणार नाही
  खा.जाधव यांनी आपल्या भाषणात पाथरीत चालणाऱ्या दादागिरीवर भाष्य केले होते. त्याचा धागा धरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी डॉनगिरी चालू देणार नाही. आम्ही देखील दबंग पेक्षा कमी नाही. रावणगिरी चालू दिली नाही, डॉनगिरीला तर केव्हाच संपवू असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.

Trending