आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • CM Fadnavis Waiting For Amit Shah In Airport For An Hour

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहांची वाट पाहत मुख्यमंत्री तासभर विमानतळावर ताटकळले; तेवढा वेळ अल्बम आणि मोबाइल पाहण्यात घालवला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रविवारी येथील श्री गुरुगोविंदसिंगजी विमानतळावर पक्षाध्यक्ष अमित शहा यांची वाट पाहत ५५ मिनिटे ताटकळत बसावे लागले. हा वेळ मुख्यमंत्र्यांनी पुस्तक, अल्बम आणि मोबाइल पाहण्यात घालवला. 

 

लातूर येथील कार्यक्रमासाठी पक्षाध्यक्ष अमित शहा दुपारी ३ वाजता दमन येथून विमानतळावर येणार होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही त्याचवेळी पोहोचून नंतर दोघेही हेलिकाॅप्टरने लातूरकडे जाणार होते. नियोजित कार्यक्रमानुसार मुख्यमंत्री ३ वाजून ५ मिनिटांनी विमानतळावर आले. परंतु अमित शहा यांना येण्यास विलंब होता. त्यामुळे मुख्यमंत्री विमानतळावर स्वागत स्वीकारून विमानतळावरील व्हीआयपी कक्षात येऊन बसले. भाजपचे बहुसंख्य नेते लातूर येथे अमित शहा यांच्या कार्यक्रमाला गेल्याने विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताला अरुंधती पुरंदरे, दिलीप कंदकुर्ते, संजय कौडगे असे मोजकेच कार्यकर्ते हजर होते. 

 

टीव्हीवरील जाहिरात पाहायची का? 
मुख्यमंत्री व्हीआयपी कक्षात आले तेव्हा टीव्ही सुरूच होता. परंतु नेमका त्यावेळी टीव्हीवर कमर्शियल शो सुरू होता. टीव्हीवर त्यावेळी टकलावर उपाय ही जाहिरात सुरू होती. आता हे पाहायचे का, ते बदला असे मुख्यमंत्री म्हणाल्यावर मग स्पोर्ट चॅनल लावण्यात आले. क्रिकेटचा आनंद घेऊ असे म्हणाले. त्यानंतर भाजपच्या अरुंधती पुरंदरे यांनी मी अशी घडले, हे वृत्तपत्रातील सदरावर आधारित पुस्तक त्यांना दिले. नांदेडच्या कर्तृत्ववान महिलांचा यात समावेश आहे आणि त्यात मी सुद्धा आहे असे सांगितल्यावर मुख्यमंत्र्यांनी स्मितहास्य केले. काही काळ त्यांनी पुस्तक चाळले. नंतर मोबाइलवर आलेल्या विविध संदेशांना उत्तर देण्यात त्यांनी काळ व्यतीत केला. जवळपास एक तास त्यांनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांची वाट पाहण्यात घालवला. परंतु त्यांच्या चेहऱ्यावर कोणताही त्रागा नव्हता. 

 

कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही मुख्यमंत्री रिलॅक्स मुडमध्ये आहेत हे पाहून भाजपचे नेेते दिलीप कंदकुर्ते यांनी शेतकरी कर्जाचा विषय छेडला. सरसकट कर्जमाफी द्यायला पाहिजे असे ते फडणवीसांना म्हणाले. त्यावर सरसकट कर्जमाफी केली तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही. बँकांना जास्त होतो असे ते म्हणाले.