आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरेंना प्रभू रामचंद्राचे आशीर्वाद मिळोत, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून दौऱ्याचे स्वागत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले आहे. उद्धव यांना प्रभू रामचंद्राचे आशीर्वाद मिळोत अशी कामना देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. सोबतच शिवसेनेचे अयोध्या दौरा हा राजकीय नाही. कारण, राम मंदिराचा मुद्दा हा राजकीय असू शकत नाही असेही ते पुढे म्हणाले आहेत. केवळ मुख्यमंत्रीच नव्हे, तर राज्यातील इतर भाजप नेत्यांनी सुद्धा ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचे समर्थन केले आहे. 


सुधीर मुनगंटीवर
राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना पक्ष प्रमुखांच्या हजारो कार्यकर्त्यांसह झालेल्या अयोध्या दौऱ्याचे स्वागत केले. उद्धव चांगल्या गोष्टीसाठी गेले आहेत. त्यांच्या या दौऱ्याचे भाजप आणि आपण वैयक्तिकरित्या समर्थन करत. राम मंदिराचा मुद्दा हा एक निवडणुकीचा मुद्दा असूच शकत नाही असे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले. 


रावसाहेब दानवे म्हणाले...
राज्य आणि केंद्रात सरकारविरोधात सर्वच राजकीय पक्ष एकत्रित येऊन भाजपला पराभूत करण्याच्या प्रयत्नात आहेत. अशात समविचारी पक्षांनी एकत्रित येणे चांगली गोष्ट आहे. शिवसेना आणि भाजप हे समविचारी पक्ष आहेत. राज्यात आणि केंद्रातही आम्ही एकत्रितच निवडणूक लढवणार आहोत कारण आम्ही एकच आहोत असे भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...