आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॉयलेटच्या बहाण्याने सीएम कमलनाथ यांचे भाचे रतुल पुरींनी केले पलायन!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे भाचे रतुल पुरी यांनी टॉयलेटच्या बहाण्याने तपास अधिकाऱ्यांना चकवा दिल्याचे उजेडात आले आहे. ते ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी गेले होते. तेव्हाची ही घटना आहे. शनिवारी दिल्लीच्या न्यायालयाने त्यांना दिलासा दिला. सोमवारपर्यंत त्यांच्या अटकेवर न्यायालयाने स्थगिती दिली आहे. 


शनिवारी सायंकाळी चौकशीसाठी ते ईडीच्या कार्यालयात आले होते. परंतु पुरी यांनी शौचास जायचे आहे, असे सांगून तपास अधिकाऱ्यांना थोडा वेळ मागितला. परंतु बहाण्याने गेलेले पुरी कार्यालयात परतलेच नाहीत. त्यामुळे तपास अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा फोन बंद होता. व्हीव्हीआयपी व्यक्तींसाठी ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी सुमारे ३६०० कोटी रुपयांचा सौदा भारताने रद्द केला होता. या सौद्यात भ्रष्टाचार व लाचखोरीचा आरोप झाला होता. या प्रकरणाची चौकशी ईडी व सीबीआयमार्फत केली जात आहे. तपास संस्थांनी आधीच अनेक आरोपपत्रे दाखल केली आहेत. 
 

राजकीय सुडापोटी कारवाई : पुरी
पुरी कोर्टात म्हणाले, मध्य प्रदेशात भाजपच्या दोन आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राज्यात त्यांचे मामा कमलनाथ मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे ईडी त्रास देण्यासाठी मला अटक करू इच्छिते. माझ्या कुटुंबालाही त्रास दिला जात आहे. मी तपासात सहकार्य करत आहे. मला अटक करण्यात येणार होती, असा दावा पुरींनी केला. पुरी हे हिंदुस्थान पाॅवर प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष असून नीता व दीपक पुरी यांचे पुत्र होत. नीता मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या बहीण होत. दीपक पुरी ऑप्टिकल स्टोअरेज मीडिया फर्म मोझरबेअरचे सीएमडी आहेत.
 

बातम्या आणखी आहेत...