आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोपीनाथ मुंडे साहेबांना अभिप्रेत असा महाराष्ट्र घडवेल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा पंकजांना रिप्लाय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो

मुंबई - भाजप नेत्या पंकजा मुंडे 12 डिसेंबर रोजी काय भूमिका घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. आता तर पंकजा मुंडेंच्या ट्विटर हॅण्डलवर भाजपचा नामोल्लेखही नाही. मात्र पंकजा मुंडे भाजप सोडणार असल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही, त्या सर्व अफवा नसल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कात आहेत, पंकजा मुंडेंची भूमिका 12 डिसेंबरला स्पष्ट होईल, असे म्हटल्याने, चर्चांना उधाण आले आहे. यादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंकजा मुंडेंच्या ट्विटला दिलेला रिप्लाय केंद्रस्थानी आला आहे.मुंडेंना अभिप्रेत महाराष्ट्र घडवणार


पंकजांना रिप्लाय देताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात, “आपले मनःपूर्वक धन्यवाद, पंकजा ताई मुंडे! ‘राज्याचे हित प्रथम’ याच संस्कृतीने आणि परंपरेने महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार महाराष्ट्राच्या हितासाठी काम करेल आणि स्व. गोपीनाथ मुंडे साहेब यांना अभिप्रेत असा महाराष्ट्र घडवेल असा विश्वास मी तुम्हाला देतो”.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंकजा मुंडेंच्या ट्विटला दिलेला रिप्लाय केंद्रस्थानी आला आहे. पंकजा मुंडे यांनी 28 तारखेला शपथविधीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ट्विट करून अभिनंदन केले होते. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रिप्लाय दिला.