Home | Maharashtra | North Maharashtra | Nashik | CM wants information about their work in Nashik

मुख्यमंत्री करणार पालिका क्षेत्रामध्ये काँग्रेस आणि भाजपच्या काळात झालेल्या विकासकामांची तुलना

प्रतिनिधी | Update - Jan 10, 2019, 10:23 AM IST

महापालिकेकडून मागवली दहा वर्षांतील कामांची माहिती

 • CM wants information about their work in Nashik

  नाशिक - लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने ब्रँडिंगची तयारी सुरू केली असून मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सन २००९ ते २०१४ आणि २०१४ ते २०१८ या काळातील विकासकामांची माहिती मागवली आहे. यातून काँग्रेसच्या व भाजपच्या सत्ताकाळातील विकासकामांची तुलना हाेणार असून जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानंतर पालिकेची धावपळ सुरू झाली आहे.

  मार्चमध्ये लाेकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू हाेण्याची शक्यता असून पाच राज्यातील पराभवानंतर भाजपने धसका घेतला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपची धावपळ सुरू झाली असून त्यांनी सर्व जिल्ह्यांतून विकासकामांची माहिती मागवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिका निवडणुकीत नाशिक दत्तक घेतले आहे. त्यामुळे नाशिकमधील भाजपच्या विकासकामांचा मुद्दा राज्यभरात चर्चेचा विषय ठरू शकताे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कार्यालयाने गत दहा वर्षातील विकासकामांची माहिती मागवली आहे. काँग्रेसची सत्ता असताना सन २००९ ते २०१४ या दरम्यान झालेल्या आणि भाजपच्या सत्ताकाळात २०१४ ते २०१८ मध्ये झालेल्या विकासाची तुलना केली जाणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महापालिकेला आल्यानंतर झोपडपट्टी, शिक्षण, समाजकल्याण, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, मलनि:सारण, वित्त व लेखा विभागाने केलेल्या कामांच्या प्रगतीबाबतचा अहवाल सादर करा असे आदेश देण्यात आले आहेत.

  ही माहिती मागवली
  २००९ ते २०१४ आणि २०१४ ते २०१८ दरम्यान या विभागांसाठी शासनाकडून किती निधी मिळाला, किती खर्च झाला, कोणती कामे झाली, त्या कामांची स्थिती काय, कोणाच्या काळात विकासासाठी जास्त निधी मिळाला याची पूर्तता करावी लागेल.

  दाेन दिवसांत द्यावी लागणार माहिती
  ही सर्व माहिती १० जानेवारीपर्यंत देण्याचे बंधन बघता दोन दिवसांत माहिती सादर करण्याचे आव्हान अधिकाऱ्यांसमोर आहे. जुन्या व नवीन कामांबराेबरच स्मार्ट सिटीतील कामेही घुसवली जाणार आहे.

Trending