Home | National | Other State | CM Yogi Adityanath Worship 51 Girls on thee Occasion Of Ramnavmi in Gorakhpur

डोक्यावर ओढणी टाकण्यापूर्वी चिमुकलीने योगींना विचारला एक भाबडा प्रश्न, हसत मुखाने योगी अदित्यनाथ यांनी दिले उत्तर...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 15, 2019, 02:42 PM IST

योगींनी 51 मुलींची केली पुजा नंतर आपल्या हाताने वाढले जेवण

 • CM Yogi Adityanath Worship 51 Girls on thee Occasion Of Ramnavmi in Gorakhpur

  गोरखपूर(उत्तर प्रदेश)- मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रामनवमीच्या दिवशी गोरखनाथ मंदिरमध्ये कन्या पुजन केले. शनिवारी त्यांनी गोरखनाथ मंदिरमध्ये कन्या आणि बटुक भैरवांच्या पायांची पुजा केली. त्यापूर्वी योगींनी 51 मुलींच्या पायाची पुजा केली. नंतर त्यांना स्वत:च्या हाताने जेवण वाढले.


  मुलीचे उत्तर ऐकून हसले योगी
  कन्या भोजसाठी मंदिरात पोहचलेल्या मुलींनी योगींना अनेक प्रश्न विचारले. एका मुलीने डोक्यावर ओढणी टाकण्यापूर्वी विचारले- आम्हाला पैसे मिळतील ना...? हसतमुखाने योगींनी उत्तर दिले- पैसे ओढणीतच ठेवलेत.

  शतकांपासून सुरू आहे परंपरा
  गोरखनाथ मंदिराच्या अदिकृत ट्विटर हँडलवरून योगींनी केलेल्या पुजेचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. असे सांगितले जाते की, गोरखनाथ मंदिरात ही परंपरात अनेक वर्षांपासून सुरू आहे. दरवर्षी येथे रामनवमीच्या दिवशी योगी आदित्यनाथ यांच्यातर्फे कन्या पूजन केले जाते. ते मुख्यमंत्री बणल्यानंतरदेखील ही पुजा सुरू आहे. यावर्षीदेखील अनेक कामातून वेळ काढून त्यांनी ही पुजा केली.

Trending