आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात सरावादरम्यान दुर्घटना; सस्पेंशन पूल तुटल्याने दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, चार जखमी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
  • सीएमईमध्ये पूल बांधण्याचा सराव सुरू होता, पूल तुटल्याने पुलावरील 6 जवान खाली पडले
  • दुर्घटनेत 4 जवान जखमी, दोघांची प्रकृती गंभीर; यामध्ये कनिष्ठ कमिशनर ऑफिसरचा समावेश

पुणे - पुण्यातील दापोडीच्या कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरिंग (सीएमई)मध्ये आज सरावादरम्यान सस्पेंशन पूल तुटल्याने 2 जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर कनिष्ठ कमिशनर अधिकाऱ्यासह 4 जवान जखमी आहेत. ट्रेनिंग दरम्यान लोखंडी पूल बांधत असताना हा पूल जवानांच्या अंगावर कोसळला.  सीएमईमध्ये लष्कराचे तीनही विभाग, कॉम्बॅट इंजिनिअरिंग विभाग, बॉर्डर रोड इंजिनिअरिंगचे कर्मचारी आणि अधिकारी अभियांत्रिकीचा अभ्यास करतात.संरक्षण जनसंपर्क अधिकारी महेश आयंगर यांनी सांगितले की, पूल बांधण्याच्या प्रशिक्षणादरम्यान याचा एक भाग खाली कोसळला. पूलावर चढलेले जवान खाली पडून जखमी झाले. यानंतर सर्वांना उपचारासाठी कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. येथे उपचारादरम्यान पी.एस संजीवन आणि बी.के. वाघमोडे यांचा मृत्यू झाला. या संपूर्ण प्रकरणासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत.