आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 हजार रुपयांमध्ये तुमच्या स्कुटरला बसवा सीएनजी किट, 44 रुपयांमध्ये 80 किलोमीटरचा प्रवास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पेट्रोलचे वाढते भाव पाहून गाडी चालवने खिशाला महाग झाले आहे. यावर आता तुम्ही एक उपाय करू शकता. तुमच्या स्कूटरमध्ये सीएनजी किट बसवून तुम्ही पैसे वाचवू शकता. सीएनजी गॅसच्या किटमुळे गाडी 44 रुपयांमध्ये 80 किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकते. यापद्धतीने तुम्ही पेट्रोलच्या आर्ध्या किंमतीत दुप्पट अंतर प्रवास करू शकता. सीएनजी किटसाठी तुम्हाला 15 हजार रुपयांचा खर्च येतो. सीएनजीसोबतच तुम्ही स्कुटर पेट्रोलवरदेखिल चालू शकता. यासाठी स्कुटरला एक स्विच बटन असते.

 

Honda Activa स्कुटरमध्ये सुरू असलेली टेस्टिंग झाली यशस्वी 

स्कुटरमध्ये सीएनजी किट बसवण्याचे काम Lovato कंपनीकडून केले जाते. स्कुटरमध्ये सध्या Honda Activa मध्ये या किटची टेस्टिंग यशस्वी झाली आहे. सीएनजी किट ही आफ्टर मार्केट फिटिंग आहे. कंपनीकडून अशाप्रकारची कोणतीही सीएनजी किट बसवण्यात आली नाही. परंतू भारत सरकारकडून सीएनजी किट बसवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यासोबतच ऑटोमोटिव रिसर्च अथॉरिटी ऑफ इंडियानेही हे किट बसवण्याला परवानगी दिली आहे. या किटची विक्री महानगरपालिकेडून करण्यात आली आहे. तुम्हालाही तुमच्या गाडीला सीएनजी किट  बसवायचे असेल तर त्यासाठी MGL Connect हे अॅप डाउनलोड करावे लागते. या अॅपवर तुम्हाला सीएनजी स्टेशन, सीएनजी किट फिटिंग स्टेशन सर्व माहीती मिळते. त्यानंतर सीएनजी किट बसवण्यासाठी तुम्हाला जवळच्या डीलरशी संपर्क साधावा लागतो.

 

पुढच्या स्लाइडवर वाचा- गाडीच्या डिझाईनमध्ये होणार नाहीत कुठलेही बदल

बातम्या आणखी आहेत...