आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीएनजी, पीएनजी, युरियाचे दर वाढणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- नैसर्गिक वायूच्या दरात एक एप्रिलपासून १० टक्क्यांची वाढ होणार आहे. सध्या एका युनिटची किंमत ३.३६ डॉलर आहे. एप्रिलपासून हे दर ३.६९ डॉलर होतील. यामुळे वाहनांमध्ये वापर होणाऱ्या सीएनजी आणि पाइपने पुरवठा होणाऱ्या स्वयंपाकाचा गॅस पीएनजी महाग होणार आहे. याव्यतिरिक्त युरिया उत्पादनाच्या खर्चातही वाढ होणार आहे. अवघड खाणीतून काढण्यात येणाऱ्या गॅसची किंमत जास्त असते. याची किंमत. ६७ डॉलरवरून वाढून ९.३२ डॉलर प्रतियुनिट होईल. गॅसचे युनिट मॅट्रिक मिलियन ब्रिटिश थर्मल युनिट (एमएमबीटीयू) मध्ये माेजले जाते.  सूत्रांच्या माहितीनुसार आचारसंहिता लागू असल्याने दरात वाढ करण्याचा प्रस्ताव निवडणूक आयोगाला पाठवण्यात आला आहे. 
बातम्या आणखी आहेत...