आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Coach Ramakant Achrekar Last Rites In Mumbai, Team India Tributes In Australia

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतरत्न क्रिकेटर घडवणारे पद्मश्री आचरेकरांचा सरकारला विसर! शासकीय इतमामात अंत्यसंस्कार नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या वडीलधाऱ्या कोचच्या अंत्ययात्रेत खांदा देताना सचिन... - Divya Marathi
आपल्या वडीलधाऱ्या कोचच्या अंत्ययात्रेत खांदा देताना सचिन...

मुंबई - भारत आणि ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील चौथ्या मॅचला सिडनीत सुरुवात झाली. या सामन्याची सुरुवात होताच भारतीय संघाचे सदस्यांनी आपल्या बाह्यांना काळ्या पट्ट्या लावून क्रिकेट विश्वातील दिग्गज प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना श्रद्धांजली वाहिली. रमाकांत आचरेकर यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, प्रवीण आमरे यांसारख्या अनेक क्रिकेटपटूंना घडवले आहे. त्यांच्या प्रशिक्षण क्षेत्रातील योगदानाचा गौरव म्हणून भारत सरकारने त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. आचरेकर यांच्यावर शिवाजी पार्क परिसरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले. तत्पूर्वी त्यांच्या पार्थिवाच्या दर्शनाला दिग्गज मंडळी आणि चाहत्यांची गर्दी आहे. यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसह अनेकांचा समावेश होता.

 

पद्मश्री असतानाही शासकीय इतमामात अंत्यसंस्कार नाही

द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित रमाकांत आचरेकर यांना केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. तरीही त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडलेले नाही. याच माणसाने भारतरत्न सचिन तेंडुलकर घडवला आहे. त्यामुळे, आचरेकरांच्या कारकीर्दीचा सरकारला विसर पडला की काय अशी प्रतिक्रिया सामान्य नागरिकांमधून उमटली आहे. दरम्यान, यासंदर्भात प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

 

स्वर्गातील क्रिकेटविश्वही समृद्ध झाले असेल -सचिन
सचिन तेंडुलकर यावेळी आपल्या गुरुच्या अंत्यसंस्कारात भावूक झाला. तत्पूर्वी मास्टर ब्लास्टर सचिनने आपले वडिलधारे गुरू रमाकांत आचरेकर यांना श्रद्धांजली वाहिली. स्वर्गातील क्रिकेटविश्वही समृद्ध झाले असेल, कारण तेथे आज आचरेकर सरांची उपस्थिती लाभली. त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांप्रमाणे मीदेखील त्यांच्याच मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे घेतले. माझ्या आयुष्यातील त्यांचे योगदान शब्दांत मांडू शकणार नाही. त्यांनी एक भक्कम पाया रचला आणि त्यावरच आज मी उभा आहे. गेल्या महिन्यात मी सरांच्या काही विद्यार्थ्यांसह त्यांची भेट घेतली होती. त्या वेळी जुन्या आठवणींना उजाळा देत सरांसोबत खूप चांगला वेळ घालवला. आचरेकर सरांनी आम्हाला कायम सरळ खेळण्याचेच नव्हे, तर सरळ वागण्याचे देखील धडे दिले. त्यांच्या आयुष्यातील एक भाग बनण्याची आणि त्यांचे प्रशिक्षण घेण्याची संधी दिल्याबद्दल मी आचरेकर सरांचे आभार मानतो. खूप चांगले खेळलात तुम्ही सर आणि तुम्ही जेथे कुठे असाल, तेथे आणखी चांगले प्रशिक्षण तुम्ही द्याल, असे सचिनने आपल्या श्रद्धांजलीत म्हटले आहे.

 

As a mark of respect to the demise of Mr.Ramakant Achrekar, the team is wearing black arm bands today. #TeamIndia pic.twitter.com/LUJXXE38qr

— BCCI (@BCCI) January 2, 2019