आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्लासचालकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नाशिकरोड - खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर वारंवार बलात्कार केल्याचा प्रकार नाशिकरोड परिसरात उघड झाला आहे. पीडित मुलीचे मोबाइलवर आक्षेपार्ह फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केल्याची तक्रार दाखल झाली असून संशयिताविरोधात 'पोस्को'अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


एकलहरा मार्गावरील बारावीत शिकणाऱ्या पीडितेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ती सप्टेंबर २०१६ मध्ये नाशिकरोड येथील एका खासगी क्लासमध्ये इंग्रजी शिकण्यासाठी जात होती. शिक्षक अनिल अवचारे याचे पीडित युवतीच्या वडिलांशी चांगले संबंध असल्याने त्याचे घरी येणे जाणे होते. एकदा घरी कोणी नसताना अवचारेने तिचे मोबाइलवर आक्षेपार्ह फोटो काढले. त्यानंतर बलात्कार केला. फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्यानंतरही अत्याचार केला. लग्न झाल्यानंतरही संशयिताने अनेकदा बलात्कार केला. पीडित मुलीने याबाबत घरच्यांना सांगितले असता त्यांनी तत्काळ पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. अधिक तपास नाशिकरोड पोलिस करीत आहेत. 
 

 

बातम्या आणखी आहेत...