आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Under Construction Building In Bhajanpura Area Collapsed, Children Studying In Coaching Stranded

भजनपुरा परिसरातील कोचिंग सेंटरची इमारत कोसळली, चार विद्यार्थ्यांसह एका शिक्षकाचा मृत्यू तर अनेकजण जखमी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • घटना संध्याकाळी साडे चार वाजता घडली, बचावकार्य सुरू

नवी दिल्ली- येथील भजनपुरा परिसरातील कोचिंग सेंटरची इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. दिल्ली पोलिसांनी सांगित्यानुसार या दुर्घटनेत जखमी झालेल्या 13 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 4 विद्यार्थ्यांसह 5 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्ली फायर सर्व्हिस विभागाच्या अधिकाऱ्यांने सांगितले की, काही विद्यार्थ्यांना बाहेर काढले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोचिंग सेंटरच्या मालकाचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. त्यांचे नाव उमेश आहे. उमेश आणि त्यांचा भाऊ शंकर घरातच अनेक वर्षांपासून कोचिंग सेंटर चालवत होते. उमेश दुर्घटनेपूर्वी तिसऱ्या मजल्यावर सुरू असलेले बांधकाम पाहण्यासाठी गेले होते.