आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल इंडिया कंपनी पुढील वर्षापर्यंत करणार 10 हजार कर्मचाऱ्यांची भर्ती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आर्थिक मंदीमुळे अनेक क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांच्या कामावरून काढण्यात आहे. अशावेळी कोल इंडीया ट्रेंड यापेक्षा उलट चालली आहे. कोल इंडियात एकूण 10 हजार कर्मचाऱ्यांच्या भर्तीची योजना आखत आहे. सरकारी कंपनी कोल इंडिया पुढील आर्थिक वर्षात 750 मिलियन टन कोळशाचे उत्पादन करणार आहे आणि यावेळी अनेक लोकांना रोजगाराची संधी मिळणार असल्याचे केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले. 2024 पर्यंत 1 अब्ज टन कोळशाचे उत्पादन करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. कोल इंडियाला आपले लक्ष्य पूर्ण करण्यासाठी भविष्यात 10 हजार कर्मचाऱ्यांची भर्ती करणार आहे.   

सध्या कोल इंडिया देशातील 82 टक्के कोळसा तयार करते
प्रल्हाद जोशींनी देशाच्या वेगाने वाढणारी उर्जा गरज लक्षात घेता कंपनीला लक्ष्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश व्यवस्थापनाला दिले आहे. तसेच भारत सरकार आणि कोळसा मंत्रालय कोल इंडियाला लक्ष्य साध्य करण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे जोशींनी सांगितले. सध्या कोल इंडिया देशातील 82 टक्के कोळसा तयार करते. 

कंपनी वेळेवर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करून आपले उद्दिष्ट साध्य करेल
देशाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी कोळसा उत्पादन वाढवण्यासाठी कोल इंडिया व्यापक भांडवली खर्च करेल या बाबत जोशींनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच कंपनी वेळेवर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करून आपले उद्दीष्ट साध्य करणार आहे.