आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्याच्या हितासाठी काँग्रेससोबत युती, आमच्या फॉर्मुलाची कोणीही चिंता करू नये - शिवसेना नेते संजय राऊत  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महाराष्ट्राच्या हितासाठी एकसूत्री कार्यक्रम राबवणार आहेत. 5 वर्ष नाही तर 25 शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांना देखील टोला लगावला. शुक्रवारी सकाळी राउत यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते. दरम्यान संजय राऊत यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे देणे टाळले.   
महाराष्ट्राला शिवसेनाच नेतृत्व देणार आहे. आमच्या फॉर्मुलाची कोणालाही चिंता करण्याची आवश्यकता नाही. ते उद्धव ठाकरे ठरवतील. 5 वर्ष नाही तर पुढील 25 वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा अशी आमची इच्छा आहे. मात्र मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन मी असे म्हणणार नसल्याचे सांगत राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.
राज्यात हितासाठी काँग्रेससोबत युती करत आहोत. यापूर्वीही अशाप्रकारचे सरकार स्थापन झाले आहेत. शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांची काँग्रेसची विचारधारा होती. मात्र त्यांच्या मंत्रीमंडळात इतर विचारधारेचे नेते होते असे ते यावेळी म्हणाले. 

 

बातम्या आणखी आहेत...