आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंगेर - बिहारच्या मुंगेर जिल्ह्यात राहणाऱ्या पुतूल देवी यांचा जीव मंगळवारी पहाटे जवळपास दीड तास धोक्यात अडकला होता. जवळपास पाच फूट लांबीच्या नागाने त्यांच्या पायाला वेढा घातलेला होता आणि फणा काढून तो नाग उभा होता. साक्षात मृत्यू समोर उभा असावा अशी पुतुल देवी यांची अवस्था झालेली होती. कल्याण टोला गावातील या घटनेत महिला जीव वाचण्यासाठी सारखा देवाचा धावा करत होती.
सापाच्या फुत्कारांनी उघडली झोप
पुतुल देवी घरामध्ये जमिनीवर झोपलेल्या होत्या. त्यांचे पती मनोज वऱ्हांड्यात तर मुले एतवारी कुमार आणि लड्डू कुमार गच्चीवर झोपलेले होते. पुतुल यांनी मच्छरांपांसून वाचण्यासाठी मच्छरदानी लावलेली होती. पण झोपेत त्यांचा एक पाय मच्छरदानीच्या बाहेर आला. रात्री सुमारे 2:30 वाजता सापाच्या फुत्काराच्या आवाजाने त्यांची झोप मोडली. त्यांनी पाहिले तर एक भलामोठा साप त्यांच्या पायाला वेढा घालून आणि फणा काढून बसला होता. त्या ओरडणार होत्या, पण त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. साक्षात मृत्यू समोर पाहून त्यांची दातखिली बसली होती.
देवाची प्रार्थना करत राहिल्या
पुतुल यांनी नागासमोर हात जोडले आणि त्यांनी देवाचा धावा सुरू केला. त्या ओरडू शकत नव्हत्या. पण त्यांचा आवाज ऐकूण मुलाला जाग आली. त्याने वडिलांनी सांगितले. त्यांनी आत पाहिले तर त्यांना धक्काच बसला. काही वेळातच गावातील लोक व गर्दी जमली. सुमारे दीड तास तो साप तसाच होता, अखेर दीड तासाने तो साप त्याठिकाणाहून निघून गेला. कोणीही नागाला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.