आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Cocaine Smuggling: Pacific Ocean, Drug Smugglers Use Package OF Coke To Stay Flat After Boat Shank Off

प्रशांत महासागरात बोट बुडाल्याने स्मगलर कोकेनच्या पॅकेटच्या साहाय्याने तरंगत राहीले, कोलंबियातील नेव्हीने घेतले ताब्यात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलंबिया- नेव्हीने प्रशांत महासागरातून तीन तरुणांना कोकेनच्या पॅकेटसह घेतले ताब्यात. पोलिसांनी सांगितल्यानुसार, त्यांची बोट बुडाल्यानंतर ते सर्व स्मगलर कोकेच्या पॅकेट्सच्या साहाय्याने समुद्रात जिवंत राहीले.

लाटांमुळे बुडाली बोट
नेव्हीने तीन तरुणांना कोलंबियामधील टुमाकोच्या किनारपट्टीपासून 55 किलोमीटर दुर समुद्रात पकडले. स्थानीक मीडियाने सांगितल्यानुसार समुद्रातील मोठ्या लाटांमुळे त्यांची बोट बुडाली. कोलंबियन नेव्हीने तरुणांना वाचवण्यासाठी पाण्यात लाइफ रिंग टाकल्या, त्याच्या साहाऱ्याने ते वाचले. पकडल्यानंतर त्यांना स्थानीक रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर अधिकाऱ्यांनी त्यांना तुरुंगात टाकले.
अधिकाऱ्यांना त्यांच्याकडून 1200 किलो कोकेन जप्त केले. 
 

बातम्या आणखी आहेत...