आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोंबड्याला लागला दुचाकीचा लळा; मालकासोबतच मारतो दुचाकीवरून फेरफटका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पापरी- मोहोळ तालुक्यात दुचाकीवर बसणाऱ्या कोंबड्याचा विषय कुतुहलाचा बनला आहे. सावळेश्वर (ता. मोहोळ) येथील औदुंबर सतीश लवटे या तरुणाचा हा कोंबडा असून, लवटे हे चिंचोली एमआयडीसीत एका कंपनीत काम करतात. लवटे यांना कोंबडे व ससे पाळण्याचा छंद आहे. सतत प्रयत्न करून त्यांनी त्याला गाडीवर कोंबड्याला बसायला शिकवले. कोंबड्याची भीती गेली. त्याला आता गाडीवर बसायची सवय लागली आहे. 


कोंबड्याला गाडीची व प्रवासाची इतकी आवड लागली आहे की, औदुंबर गाडीवर बसायच्या अगोदर कोंबडाच गाडीवर चढून बसतो आहे. कोंबड्याला बसण्यासाठी गाडीच्या हॅण्डलला समोरील बाजूस एक स्टॅण्ड बनवून घेतले. लवटे हे मोहोळला बाजारला येताना सोलापूरला काही कमानिमित्त जाताना, इतर परगावी जाताना त्यास घेऊन जातात. हा कोंबडा दुचाकीच्या ताशी पन्नास किमीच्या वेगालाही डगमगत नाही, असे लवटे म्हणाले. औदुंबर यांची कोंबडा बसलेली दुचाकी जिथे जाईल तिथे युवकवर्ग जमा होतात व सेल्फी काढून घेतात. 

बातम्या आणखी आहेत...