Home | National | Gujarat | Coins Of 80 Thousand Rupees For Wife Compensation After Divorce Case of a family court in nadiad of Gujarat

पत्नीला पोटगीचा दुसरा हप्ता द्यायचा होता, पोत्यात पैसे घेऊन गेला पती, जजपासून वकिलांपर्यंत सर्वांना बसला धक्का

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 31, 2018, 02:30 PM IST

गुजरातेत एका पतीने पोटगीच्या रकमेपोटी पत्नीला पहिल्या हप्त्यात 26 हजार रुपये दिले यानंतर आता दुसऱ्या हप्त्यात 80 हजार.

  • Coins Of 80 Thousand Rupees For Wife Compensation After Divorce Case of a family court in nadiad of Gujarat

    नडियाद (गुजरात) - गुजरातेत एका पतीने पोटगीच्या रकमेपोटी पत्नीला पहिल्या हप्त्यात 26 हजार रुपये दिले यानंतर आता दुसऱ्या हप्त्यात 80 हजार रुपयांची नाणी दिली. ही घटना नडियादच्या एका कौटुंबिक न्यायालयातील अहो. पती-पत्नीच्या खटल्यात कोर्टाने पतीला 1.06 लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश दिले होते. यानंतर गुरुवारी तो पोत्यात पैसे घेऊन कोर्टात पोहोचला. पोत्याचे तोंड उघडताच एवढी सगळी नाणी पाहून जजपासून ते वकिलांपर्यंत सर्वांनाच धक्का बसला. जज यांनी विचारले- ही नाणी किती आहेत? पती म्हणाला- हुजूर एकूण 80 हजार रुपये.

    वकिलांनी दोन टप्प्यांत केली मोजदाद
    या चिल्लरमध्ये एक, दोन, पाच आणि 10 रुपयांची नाणी होती. वकिलांनी त्याची दोन टप्प्यांत मोजणी केली. यात 3 तासांहून जास्त वेळ लागला. नडियादच्या जवळ चलाली गावातील रहिवासी जयेश तलपदा म्हणाले की, ते भाजी विक्रेता आहेत. त्यांच्याकडे जास्तकरून चिल्लरच येते. एवढ्या नाण्यांच्या बदल्यात नोटा द्यायला कुणी तयार होत नाही. यामुळे ते या चिल्लरमधूनच पोटगीची रक्कम देत आहेत. याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. यापूर्वीही कोर्टाच्या आदेशावरून जयेशने पत्नीला पोटगीसाठी 26 हजार रुपयांची चिल्लर दिली होती. जी घ्यायला त्याच्या पत्नीने नकार दिला होता. मग कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर नाणी घ्यावी लागली होती.

Trending