आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतून सहा कोटींचे कोकेन जप्त; दाेन विदेशी अटकेत; दोघेही आंतरराष्ट्रीय तस्करी टोळीचा एक भाग असल्याचे उघड 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अमली पदार्थविरोधी पथकाने शनिवारी रात्री उशिरा मुंबईतून १ किलाे ५ ग्रॅम काेकेन जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सहा कोटी रुपये हाेते. या प्रकरणी दोन विदेशी नागरिकांना अटक करण्यात आली. 

 

आंबोली परिसरातील सीझर रोड जंक्शन या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. डॅनियल इझिके (वय ३८) असे या आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तर त्याच्याकडील माहितीच्या आधारे पोलिसांनी दुसऱ्या ठिकाणाहून जॉन जेम्स फ्रान्सिस यास अटक केली. त्याच्याकडूनही तीन कोटी रुपयांचे अर्धा किलो कोकेन हस्तगत केले.

 

या प्रकरणी आरोपींवर एनडीपीएस कायद्यान्वये कारवाई करण्यात आली असून दोघेही आंतरराष्ट्रीय तस्करी टोळीचा एक भाग होते. या दोघांचे कुणाकुणाशी लागेबांधे होते का, याबाबतचा तपास सुरू असल्याची माहिती पथकाचे प्रमुख शिवदीप लांडे यांनी दिली. 

बातम्या आणखी आहेत...