Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | Cold Drinking Water Can Damage Your Health In 8 Ways

हिवाळ्यात फ्रिजचे पाणी पिणे ठरू शकते घातक... थंड पाण्याने शरीरावर होतात 'हे' 8 दुष्परिणाम

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 10, 2018, 12:40 PM IST

थंडीच्या दिवसांत फ्रिजमधील पाणी पिणे म्हणजे आजारांना आमंत्रण देणे...

  • देशभर थंडीची सुरुवात झाली आहे. त्यामुळे, घटत्या तापमान आणि बदलत्या हवामानात अनेकांच्या आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. त्यातच थंडीत सर्दी किंवा खोकला होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. अशा वातावरणात आपण फ्रिजमधील थंड पाणी पीत असाल तर आजारी पडण्याचा धोका वाढू शकतो. डॉक्टर गीतांजली शर्मा (BAMS, Ph.D) यांच्या मते, शरीराचे तापमान अचानक वाढल्याने किंवा कमी झाल्याने हार्ट अटॅक आणि मेंदू गोठण्याचा धोका असतो. त्यामुळे, पाणी पिताना नेहमीच काळजी घ्यायला हवी. थंड पाणी पिताना शरीराचे तापमान काही क्षणात बदलते. त्याचे थेट नुकसान संपूर्ण शरीरावर होते. थंड पाणी पिल्यामुळे आपल्या शरीराचे किती नुकसान होऊ शकते, हे या व्हिडिओमध्ये पाहता येईल.

Trending