आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पृथ्वीपेक्षा 3 पट मोठा पण गोठलेला ग्रह सापडला, 233 दिवसांचा एक वर्ष, आपल्या सूर्यापासून अवघ्या 6 प्रकाश वर्ष दूर...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - पृथ्वी व्यतिरिक्त इतर ठिकाणी एलियन लाइफचा शोध घेणाऱ्या संशोधकांच्या हाती मोठे यश आले आहे. पृथ्वीच्या सूर्यापासून नवीन प्लॅनेट अवघ्या 6 प्रकाश वर्षे दूर आहे. विशेष म्हणजे, या ग्रहावर बर्फाचे जाड आवरण आणि त्या खाली पाणी आहे. अर्थातच त्या पाण्यात जीवसृष्टी असल्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. या ग्रहाचा आकार पृथ्वीपेक्षा 3.2 पटीने जास्त आहे. परंतु, ज्या सूर्याभोवती हा ग्रह फिरतो त्याचे वय आपल्या सूर्यापेक्षा दुप्पट असल्याने तो या ग्रहाला पुरेशी उब देऊ शकत नाही. 


1970 मध्ये केलेली भविष्यवाणी खरी ठरली...
कॅलिफोर्निया येथे खगोलशास्त्रज्ञांची संशोधन संस्था कार्नेजी ऑब्झर्वेशन्सचे पॉल बटलर यांनीही Nature या रिसर्च पेपरमध्ये को-ऑथर म्हणून याबद्दल लिहिले आहे. गेल्या अनेक दशकांपासून आकाशगंगेतील दुसरा सर्वात तेजस्वी सूर्य बरनार्ड सनचा खगोलशास्त्रज्ञ अभ्यास करत होते. 50 वर्षांपूर्वी 1970 मध्ये खगोलशास्त्रज्ञ पीटर व्हॅन डी कॅम्प यांनी बरनार्ड ताऱ्याभोवती एक ग्रह फिरत असावे असे संशोधन मांडले होते. त्यांचा हा दावा इतका खंबीर होता की ब्रिटिश संशोधकांनी एक मानवरहित स्पेस शिप पाठवून ताऱ्याचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला होता. 


20 वर्षांच्या संशोधनाला यश
1995 मध्ये त्यावर संशोधन सुरू झाले आणि ताऱ्याभोवती ग्रह असल्याचा शोध लागला. परंतु, त्या ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी 50 संशोधक आणि 25 खगोलशास्त्रज्ञांच्या टीमने 20 वर्षे संशोधन केले. विविध देशातील टेलिस्कोपने घेतलेल्या इमेजेसनंतर हळू-हळू सिग्नल मिळण्यास सुरुवात झाली आणि या ग्रहासह त्याच्या बुटक्या सूर्याची गुपित समोर आली. 


अशी आहेत या ग्रहाची वैशिष्ट्ये...
- या ग्रहाचे नाव 'बरनार्ड्स स्टार बी' असे आहे. बरनार्ड सन हा पृथ्वीच्या सूर्यापासून सर्वात जवळचा आणि सर्वात तेजस्वी तारा आहे. या ताऱ्याच्या शेजारीच तीन ताऱ्यांचा एक समूह असून त्याला अल्फा सेंटॉरी असे म्हणतात. हा समूह पृथ्वीवरून सुद्धा पाहता येतो. त्या ताऱ्यांपैकी एकाचे नाव प्रॉक्झिमा सेंटॉरी आहे. याच ताऱ्याभोवती (सूर्य) बरनार्ड स्टार बी हा प्लॅनेट फिरत असतो.
- नवीन ग्रहाचा सूर्य पृथ्वीच्या सूर्यापेक्षा वयाने दोन पट मोठा आणि आकाराने 10 पट लहान आहे. सूर्यप्रकाश सुद्धा पुरेसा नसल्याने या ग्रहाचे तापमान -150 अंश सेल्सिअस इतके थंड आहे. थंड वातावरणामुळे या ग्रहावर सर्वत्र बर्फाचा मोठा थर आहे. त्याखाली पाणी असू शकते असा संशोधकांचा अंदाज आहे. नवीन ग्रह आपल्या सूर्याचा एक चक्क लावण्यासाठी 233 दिवस घेतो. सूर्य लहान आणि कमी तेजस्वी असला तरीही ग्रहाचा आकार पृथ्वीच्या तुलनेत 3.2 पटीने अधिक आहे. 


माणसासाठी राहणे शक्य नाही...
खगोलशास्त्रज्ञांनी Nature या रिसर्च पेपरमध्ये लिहिल्याप्रमाणे, बरनार्ड स्टार बी या ग्रहाचा सूर्य अतिशय प्राचीन आहे. तेज कमी झाल्याने संशोधकांना त्याचा अधिक चांगल्या प्रकारे अभ्यास करता येईल. परंतु, त्याचा प्रकाश ग्रहाच्या फिरण्यासह रंग बदलतो. ग्रहाच्या गतीनुसार, सूर्यप्रकाशाचा रंग गळद्द भगवा किंवा निळा होत राहतो. यासोबतच, ग्रह फिरत असताना त्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे सूर्यावर सुद्धा परिणाम होतो आणि घातक रेडिएशनचे ब्लास्ट त्या ग्रहावर पोहोचतात. अशात सामान्य माणसाचे त्या ग्रहावर राहणे शक्य नाही. तरीही बर्फाखाली प्राचीन एलियन लाइफचे पुरावे मिळू शकतील. असेही होऊ शकते की त्या बर्फाखाली असलेल्या पाण्यात सजीव असतील अशा संशोधकांना अपेक्षा आहेत.

बातम्या आणखी आहेत...